दिग्रस येथे एसटी कर्मचाऱ्याचे विविध मागण्यांसाठी बेमुदत उपोषण…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुरुषोत्तम कुडवे ९३७०४६४८२४
दिग्रस :-
रा.प.कामगारांच्या आर्थीक व महत्वांच्या प्रश्नांची सोडवणुक झालेली नाही. दिवाळी सारखा महत्वाचा सण दि. २ ऑक्टोबर २०२१ पासुन सुरु होत असल्याने दिवाळीच्या सणापूर्वी कामगारांच्या मागण्या मान्य करुन कामगारांना प्रलंबीत आर्थीक देणे देण्याच्या दृष्टीने प्रशासनाने त्वरीत कार्यवाही करावी यासाठी दि. १९ ऑक्टोबर २०२१ रोजी झालेल्या विविध कामगार संघटनेच्या कृती समितीच्या बैठेकीमध्ये दि. २७ ऑक्टोबर २०२१ पासून राज्यभर बेमुदत उपोषण करण्यात आले. त्यावर रा.प. प्रशासनाने याबाबत कोणतीच दखल घेतली नसल्याने आज गुरुवार , दि. २८ ऑक्टोबर २०२१ रोजी पासुन दिग्रस आगारातील संघटना पदाधिकारी व सर्व कर्मचारी बेमुदत उपोषण करणार असल्याचे निवेदन दि.२७ ऑक्टोबर २०२१ रोजी पोलीस निरीक्षक सोनाजी आम्ले यांना देण्यात आले आहे.
उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, राज्य परिवहन महामंडळ, वाहतुक भवन मुंबई यांना दिलेली दि. १९.१०.२०२१ रोजीची राज्यभर बेमुदत उपोषण नोटीस, संदर्भीय नोटीसच्या अन्वये रा.प. महामंडळातील सर्व संघटना कृती समीतीच्या वतीने राज्यभर बेमुदत उपोषण करण्यात येणार आहे. कोरोनाच्या कालावधीत रा.प. कामगारांनी आपला जीव धोक्यात घालून रा.प. महामंडळाची प्रवाशी वाहतुक दिवसरात्र सुरु ठेवलेली असतानांही कोरोनामुळे महामंडळातील ३०० पेक्षा जास्त कर्मचारी मृत झालेले असतांनाही कामगारांना नियमित देय तारखेला वेतन मिळत नाही. वाढीव महागाई भत्ता दिला जात नाही. वार्षिक वेतनवाढीचा दर व घरभाडे भत्याचा दर शासनाप्रमाणे लागु करण्याचा दि. ३० जून२०१८ च्या परिपत्रकान्वये मान्य करुनही अद्याप त्याची प्रशासनाकडून अंमलबजावणी केली जात नाही. त्याचप्रमाणे लॉकडाऊन काळातील कोविड भत्ता चालनातील कामगारांना अद्याप दिलेले नाही. सदर बाबतीत तरतूद मंजूर आहे. परंतु अद्याप वाटप करण्यात आलेले नाही. त्यामुळे कामगारांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झालेली असुन सध्याच्या वाढत्या महागाईच्या कालावधीत कामगारांना आपला उदरनिर्वाह करणे फारच कठीण जात आहे. त्यामुळे महामंडळातील सुमारे २५ कर्मचाऱ्यांनी आर्थीक विवंचनेपोटी आत्महत्या केलेली आहे. तरीही प्रशासनाकडून कामगारांना नियमानुसार देय होणाऱ्या आर्थीक बाबींची पूर्तता होत नसल्यामुळे संपूर्ण कामगारांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रशासनाच्या विरोधात नाराजी निर्माण झालेली आहे. त्याचप्रमाणे ऑक्टोबर २०२१ चे वेतन दिवाळीपूर्वी मिळणे आवश्यक असून सन उचल रक्कम शासकीय नियमाप्रमाणे रु.१२५००/- तसेच दिवाळी भेट रक्कम १५०००/- दिवाळीपूर्वी देण्यात यावी अशी मागणी दिलेल्या निवेदनातून केली आहे.
निवेदनावर महाराष्ट्र एसटी कामगार संघटना यवतमाळ विभाग आगार अध्यक्ष एस.एस.खान,सचिव डी. एन.गुघाणे, महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस यवतमाळ विभाग आगार अध्यक्ष एस एच राठोड, आगार सचिव एन एम गवई, महाराष्ट्र मोटार कामगार संघ यवतमाळ विभाग आगार अध्यक्ष एस एन राऊत,आगार सचिव गजानन मांगे, महाराष्ट्र नवनिर्माण रा.प.कामगार सेना यवतमाळ विभाग आगार अध्यक्ष दशरथ सहदेव,गुघाणे पाटील,राजकुमार राठोड, सोहेल खान,गफ्फार खान,सुनील कांबळे,शे.ताजुल, सै. मतीन,एन.एम.गवई, भगवान हरसुले, सुधीर मुडे, नितीन चव्हाण व सर्व दिग्रस आगार कर्मचाऱ्यांच्या स्वाक्षरी आहे.


बारावीचा ५ मे तर दहावीचा निकाल १५ मेपूर्वी; बोर्डाच्या गुणपत्रिकेवर आता विद्यार्थ्यांचा फोटो अन् क्युआर कोड; १७ मेपासून अकरावी प्रवेश….
शरद पवारांनी आज संध्याकाळी बोलवली पवार कुटुंबाची तातडीची बैठक….
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा….
मुंबई-पुणे मिसिंग लिंक मार्गाला ‘स्वातंत्र्यवीर शिंगोबा धनगर’ नाव द्यावं….
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद पेटला..! प्रकाशक प्रशांत आंबींना पोलिसांनी चिखलीतच रोखलं; आंदोलकांची धरपकड….
“.तर चुकीला माफी नाही, हे लक्षात ठेवा”; मुख्यमंत्री फडणवीसांचा लोकप्रतिनिधींना मोठा इशारा….