शेतकऱ्यांना आवश्यक असलेल्या रोपांचा रोपवाटीकेत समावेश करावा :- जिल्हाधिकारी अमोल येडगे…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ दि. 12 ऑक्टोबर :- एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत कृषी विभागातर्फे उच्च तंत्रज्ञानावर आधारित विकसित करण्यात येणाऱ्या रोपवाटिकेत शेतकऱ्यांना आवश्यक असलेल्या व उपयोगी पडणाऱ्या रोपांचा जास्तीत जास्त समावेश करण्यात यावा, अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या.
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान योजनेअंतर्गत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली महसूल भवन येथे आज आढावा सभा घेण्यात आली. यावेळी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर, कृषी विज्ञान केंद्र दारव्हाचे प्रमुख डॉ. नंदकिशोर हिरवे, नाबार्डचे जिल्हा प्रबंधक दीपक पेंदाम, लीड बँकेचे जिल्हा व्यवस्थापक अमर गजभिये, जिल्हा मार्केटिंग अधिकारी अर्चना माळवे, निरंजन चौधरी प्रामुख्याने उपस्थित होते.
जिल्हाधिकारी यांनी याप्रसंगी एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत फणस, हळद व अद्रक लागवड, मशरुम उत्पादन प्रकल्प, जुन्या फळपिकांचे पुनरूज्जीवन, सामुहिक शेततळे, शेततळे अस्तरीकरण, मधुमक्षिका पालन, नियंत्रीत शेती, यांत्रिकीकरण, प्रशिक्षण, कांदाचाळ, पॅकहाऊस, फिरते विक्री केंद्र या प्रस्तावित बाबींचा आढावा घेतला.
बैठकीला कृषी, कषी विज्ञान केंद्र व मार्केटिंग विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….