गोदावरी अर्बन यवतमाळ शाखेच्या ठेवी 300 कोटी रुपयांच्या पार…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ :-
गोदावरी अर्बनच्या यवतमाळ शाखेने 300 कोटी रुपयांच्या ठेवींची उद्दिष्टपूर्ती केली आहे. एकाच शाखेने बजावलेल्या या विशेष कामगिरीबद्दल या शाखेचे वरिष्ठ व्यवस्थापक रवी इंगळे यांचा गोदावरी अर्बनचे संस्थापक अध्यक्ष खासदार हेमंत पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
नांदेड येथे झालेल्या एका खास समारंभात गोदावरी समूहाच्या अध्यक्ष राजश्री पाटील, आमदार बालाजी कल्याणकर, श्रीराम पाटील, कमल पाटील, व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर, सचिव रवींद्र रगटे यांच्या प्रमुख उपस्थितीत रवी इंगळे यांना सन्मानित करण्यात आले.
गोदावरी अर्बनची कामाबद्दल असलेली पवित्र निष्ठा आणि प्रामाणिक प्रयत्न हेच आमच्या यशाचे गमक आहे. आमचे ग्राहक, ठेवीदार यांच्या विश्वासातूनच आणि नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करून त्या सुविधा सर्वांपर्यंत पोचवणे यातूनच हे यश प्राप्त करता आले, असे वरिष्ठ व्यवस्थापक रवी इंगळे यांनी सांगितले.