वाशीम येथे भाजप नेते किरीट सोमय्या यांचे गाडीवर शाई फेक,पोलिसांचा लाठीमार
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
वाशीम
भाजप नेते किरीट सोमय्या
आज वाशिम दौऱ्याची सुरूवात राड्यानं झाली आहे. रिसोड तालुक्यातील देगाव येथे शिवसैनिकांनी भाजप नेते किरीट सोमय्यांना काळे झेंडे दाखविले.इतकेच नाही तर यावेळी शिवसैनिकांनी सोमय्यांच्या गाडीवर शाई फेकण्याचा प्रयत्न केलाय. यावेळी जमावाला पांगवण्यासाठी शिवसैनिकांवर पोलिसांचा लाठीमार केलाय.या दौऱ्यात किरीट सोमय्या देगाव येथील भावना गवळी यांच्या रिसोड येथील बालाजी पार्टिकल बोर्ड या कारखान्याला भेट देणार आहेत. किरीट सोमय्या यांनी शिवसेना खासदार भावना गवळी यांच्यावर भ्रष्टाचार, आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप केले आहेत.
स्वत: किरीट सोमय्या यांनीही या घटनेचे फोटोज ट्विट केले आहेत.शिवसेना खासदार भावना गवळी यांनी बालाजी पार्टीकल बोर्ड कारखान्यात 100 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप काही दिवसांपूर्वी किरीट सोमय्या यांनी केला होता. त्यानंतर किरीट सोमय्या हे वाशिम दौऱ्यावर दाखल झाले असताना शिवसैनिकांनी आक्रमक होत त्यांच्या विरोधात आंदोलन केले. किरीट सोमय्या हे वाशिम दौऱ्यावर येणार असल्याने शिवसैनिक आक्रमक झाले होते. शिवसैनिकांचा आक्रमक पवित्रा पाहून सोमय्यांच्या दौऱ्यात चोख पोलीस बंदोबस्त करण्यात आला होता. मात्र, तरीही आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी सोमय्यांच्या ताफ्यावर दगड भिरकावला आणि शाईफेक केली.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….