24 तासात 25 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ, दि. 21 जून :-
गेल्या 24 तासात जिल्ह्यात 9 जण पॉझेटिव्ह तर 25 जण कोरोनामुक्त झाले आहे. जि.प. आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज एकूण 766 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 9 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 757 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 66 रुग्ण ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 72645 झाली आहे तर बरे झालेल्यांची एकूण संख्या 70793 झाली आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण 1786 मृत्युची नोंद आहे.
आज पॉझेटिव्ह आलेल्यांमध्ये आर्णी येथील एक, पांढरकवडा दोन, पुसद तीन, वणी दोन व यवतमाळ येथील एका रूग्णाचा समावेश आह
जिल्ह्यात आतापर्यत 6 लक्ष 73 हजार 766 चाचण्या झाल्या असून त्यापैकी 6 लक्ष 01 हजार 99 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 10.78 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी दर 1.17 आहे तर मृत्युदर 2.46 आहे.
जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2231 बेड उपलब्ध
जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 34 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या 2279 आहे. यापैकी 48 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 2231 बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 577 बेडपैकी 29 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 548 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 526 बेडपैकी 15 रुग्णांसाठी उपयोगात तर 511 बेड शिल्लक आणि 34 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 1176 बेडपैकी 4 उपयोगात तर 1172 बेड शिल्लक आहेत.