राष्ट्रवादी युवती काँग्रेस च्या वतीने रक्तदान शिबीर….
राष्ट्रवादी युवती काँग्रेस च्या वतीने रक्तदान शिबीर….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नांदेड (राजकिरण देशमुख) :-
कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावात राज्यभरात रक्ताचा तुटवडा होत आहे; याचे गांभीर्य लक्षात घेऊन राष्ट्रवादी युवती काँग्रेस नांदेड ग्रामीण जिल्हाच्या वतीने जिल्हाध्यक्षा ऍड.प्रियंका कैवारे यांनी दिनांक 2 मे 2021 रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले. या रक्तदान शिबीराचे उद्घाटन राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसचे शहराध्यक्षा सौ. सिंधू ताई देशमुख यांनी केले उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभा अध्यक्ष धनंजय सूर्यवंशी, राष्ट्रवादी काँग्रेसचे नायगाव तालुका अध्यक्ष भास्कर भिलवंडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस नायगाव गजानन पवार होटाळकर, राष्ट्रवादी काँग्रेस नायगाव तालुका सचिव श्याम चोंडे राष्ट्रवादी युवक काँग्रेस नांदेड(ग्रामीण) जिल्हा कार्याध्यक्ष Adv सचिन जाधव, राष्ट्रवादी पदवीधर सेलचे नांदेड (ग्रामीण) जिल्हाध्यक्ष Adv सचिन देशमुख व राष्ट्रवादी युवक काँग्रेस अर्धापूर शहराध्यक्ष संदीप राऊत उपस्थित होते
कोरोनाग्रस्त रुगणांच्या मदतीसाठी नांदेड येथे नांदेड जिल्हा राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसच्या रक्तदान शिबिरात 47 जणांनी राक्तदान केला असून राष्ट्रवादी युवती काँग्रेस जिल्हा नांदेड आयोजित हे शिबीर एक नवीन सामाजिक संदेश देत आज उत्तमरित्या पार पडला.
ह्या शिबिराच्या यशस्वीतेसाठी
राष्ट्रवादी युवती काँग्रेस जिल्हाध्यक्षा प्रियंका कैवारे पाटील ,जिल्हा उपाध्यक्षा Adv पूजा शिंदे, सरचिटणीस Adv सोनम तोष्ठवाड , प्रसिद्धी प्रमुख प्रतीक्षा भगत ,जिल्हा सचिव डॉ.सौ. उज्वला सावळे आदींनी परिश्रम घेतले. लसीकरण अगोदर अवश्य रक्तदान करा असे आवाहन प्रियंका कैवारे यांनी केले…

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….