दिग्रस येथे कोविड दक्षता केंद्र त्वरीत उभारण्यात यावे :- अँड.विवेक बनगिनवार….
दिग्रस येथे कोविड दक्षता केंद्र त्वरीत उभारण्यात यावे :- अँड.विवेक बनगिनवार….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
दिग्रस :-
दिग्रस येथे कोविड दक्षता केंद्र त्वरीत उभारण्यात यावे अशी मागणी भाजपा व्यापारी आघाडी चे प्रदेश कार्यकारीणी सदस्य तथा पश्चिम विदर्भ प्रमुख विवेक बनगिनवार यांनी आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मार्फत जिल्हाधिका-यांकडे केली आहे.
यासंदर्भात आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे व जिल्हा शल्यचिकित्सक तरंगतुषार वारे यांना लेखी पत्र पाठविले असुन त्यांच्याशी चर्चा सुध्दा केलेली आहे. दिग्रस मध्ये कोरोनाची रूग्णसंख्या मोठया प्रमाणावर वाढली आहे. परिणामी मृत्युचा दर सुध्दा वाढत आहे. रूग्णांचे तसेच मृत्युचे आकडे चिंता वाढविणारे आहे. रूग्णांना बेडस्, इंजेक्शन्स व औषधी वेळेवर उपलब्ध होत नसल्यामुळे त्यांना जीव गमवावा लागत आहे. ऑक्सीजन व व्हेंटीलेटर बेडसची समस्या ही प्रमुख समस्या झाली आहे. ऑक्सीजनचा योग्य पुरवठा होत नसल्याने ही समस्या अधिक बिकट होत चालली आहे. पैश्याअभावी सर्वसामान्य रूग्ण खाजगी दवाखान्यात उपचार घेऊ शकत नाही व जिल्हा सामान्य रूग्णालय यवतमाळ ला जाण्यासाठी वेळ लागतो त्यामुळे दिग्रस येथेच 15 बेडचे कोविड दक्षता केंद्र आवश्यक आहे.
असेही विवेक बनगिनवार यांनी म्हटले आहे. यासंदर्भात आपण आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्याशी चर्चा केली असुन त्यांनी सुध्दा जिल्हा प्रशासनाला याबाबत सुचना दिल्या असल्याबाबत विवेक बनगिनवार यांनी म्हटले आहे.

गोवंश तस्करांनी केली बजरंग दल कार्यकर्त्याची दगडांनी ठेचून निर्घृण हत्या ; सुकळी गावात मध्यरात्री घडला काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार…
लडाखमध्ये लष्कराचे ‘चीता’ हेलिकॉप्टर डोंगराला धडकले, मेजर जनरल थोडक्यात बचावले; दोन्ही पायलट जखमी….
कॉकरोच जनता पार्टीवर कारवाई; एक्स, इन्स्टानंतर वेबसाईटवरही बंदी…
पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ, चेक करा नवे दर…
दहावी पास विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, बोर्डाने घेतला मोठा निर्णय…
उद्धव ठाकरेंनी फसवलं..? बच्चू कडू यांचा खळबळजनक गौप्यस्फोट…