अंबिका नगर मधील नालीवरील रपटा दुरुस्त करण्या साठी नगरातील युवकांची अनोखी “गांधीगीरी” प्रशासन लक्ष देणार का…?

अंबिका नगर मधील नालीवरील रपटा दुरुस्त करण्या साठी नगरातील युवकांची अनोखी “गांधीगीरी”
प्रशासन लक्ष देणार का…?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
दारव्हा :- शहरातिल अंबिका नगर मध्ये गेल्या दिड महीण्यापासुन बौध्द विहार कडे जाणाऱ्या रस्त्यावर जड वाहनामुळे नालीवरील रपटा फुटल्याने मोठा खड्डा पडला असुन या खड्डयामुळे दैनदिन अपघात घडत आहे.त्यामुळे अंबिका नगर मधील काही युवकांनी संबधित प्रशासनाचे याकडे लक्ष वेधण्यासाठी आज दि.२० एप्रिलला खड्डयाभोवती चुन्याने रंगरगोटी करुन पुजन केले व खड्डयाल हारार्पन करुन अनोखी गांधीगीरी करीत संबधित प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.
सध्या कोरोना महामारीने सर्वत्र हाहाकार असुन रुग्णालयातही जाण्यास अनेकांना भिती वाटत असतांना अंबिका नगर येथील खड्डयात पडुन किरकोळ जखमी झालेल्यांना मात्र दवाखाना गाठावा लागत आहे. गेल्या दिड महीण्यापासुन अंबिका नगर मधील बौध्द विहारकडे जाणाऱ्या रस्त्यावरील नालीचा रपटा फुटून मोठा खड्डा पडल्याने या खड्डयात आतापावेतो अनेक अपघात होवून नागरीक किरकोळ जखमी झाल्याच्या घटनाही घडल्या आहे. पंरतु आतापावेतो कुणीही हा खड्डा दुरुस्ती करण्यासाठी न आल्याने शेवटी अंबिका नगर मधील काही युवकांनी या खड्डयांसमोर गांधीगिरी करीत खड्डयाभोवती चुन्याने रंगरंगोटी करुन खड्डयाला हारार्पन करुन संबधीत प्रशासनाला व लोकप्रतिनीधीला खड्डा दुरुस्ती करण्याची सदबुध्दी देण्याची प्रार्थना केली आहे. अंबिका नगर मध्ये बौध्द विहार कडे जाणाऱ्या या रस्त्यावर नेहमीच वर्दळ असते.तसेच महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला हा मिरवणुक मार्ग असुन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीला सुध्दा या रस्त्यावर असलेल्या शिवराय गृप येथुन मिरवणुकीला सुरवात होत असते. पंरतु या रस्त्यावर नालीवरील रपटा फुटून दिड महीण्याचा कालावधी लोटूनही संबधीत प्रशासन व लोकप्रतिनीधीने मात्र याकडे दुर्लक्ष केले आहे. चारचाकी वाहनही रपटा फुटल्यामुळे जावु शकत नसुन दुचाकी जाईल एवढाच रस्ता फक्त शिल्लक राहला आहे. त्यामुळे संबधित प्रशासन व निगरगट्ट लोकप्रतिनीधीने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी अंबिका नगर मधील नागरीक करत असुन नालीवरील रपटा दुरुस्त करण्यासाठी गांधिगीरी आंदोलन करणाऱ्या युवकांचेही नगरातिल नागरीकांनी कौतुक केले आहे.या गांधिगिरी आंदोलनात स्वप्ऩिल राठोड,पवन शेबे,संदिप शिले,शिवराय गृपचे संस्थापक अध्यक्ष परेश मनवर,पवन कटके,शुभम चंदन,अनुज शेंडे,गौरव गुल्हाने आदी अंबिका नगर येथील युवक सहभागी झाले होते.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….