रस्त्याने मोकाट फिराल तर जागेवरच आकारु दंड…
रस्त्याने मोकाट फिराल तर जागेवरच आकारु दंड…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नांदेड (राजकिरण देशमुख) :- नांदेड महानगरातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी व्यापाऱ्याच्या कोविड चाचणीवर भर दिल्यानंतर आता विविध भागात मोकाट फिरणाऱ्या व्यक्तींवर कायदेशिर कारवाईसाठी सहा पथक नियुक्त करण्यात आले आहेत. दोषीविरुध्द जागेवरच आर्थिक दंड आकारण्यासाठी हे पथक उद्या दि. 13 एप्रिल 2021 पासून महानगरात कार्यरत होणार आहे. भारतीय दंड संहिता 1860, साथरोग प्रतिबंध कायदा 1897, फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील तरतुदीनुसार यापूर्वी काढलेल्या आदेशानुसार कारवाई केली जाईल. नागरिकांनी विनाकारण रस्त्यावर मोकाट फिरणे टाळून स्वत: व
आपल्या कुटूंबातील सदस्यांना कोरोनाची बाधा होणार नाही यांची काळजी घ्यावी असे, आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. कारवाईसाठी नियुक्त करण्यात आलेल्या प्रत्येक पथकात आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. आवश्यकता भासल्यास संशयिताना आरोग्य तपासणीसाठी ताब्यात देवून, यातील कोणी बाधित आढळल्यास त्याला तात्काळ कोविड केअर सेंटरमध्ये पाठविण्यात येईल असेही जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी स्पष्ट केले.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….