अतिरिक्त शुल्काच्या तक्रारीसाठी आता मेल आयडी व व्हॉट्सॲप क्रमांक उपलब्ध…
अतिरिक्त शुल्काच्या तक्रारीसाठी आता मेल आयडी व व्हॉट्सॲप क्रमांक उपलब्ध…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ, दि. 5 :- शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचाराकरीता खाजगी रुग्णालयांना डेडीकेटेड कोव्हिड हॉस्पीटल म्हणून मान्यता देण्यात आलेली आहे. मात्र या रुग्णालयांमध्ये अतिरिक्त शुल्क आकारण्यात येत असल्याच्या तक्रारी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाल्या आहेत. जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता अभ्यांगत, तक्रारदार यांना कार्यालयात येण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे अतिरिक्त शुल्काबाबतच्या तक्रारी आता मेल आयडी किंवा व्हॉट्सॲप क्रमांकावर स्वीकारले जाणार आहेत. प्रशासनाने याकरीता संबंधित मेल आयडी व व्हॉट्सॲप क्रमांक उपलब्ध करून दिला आहे.
खाजगी रुग्णालयांनी कोरोनाबाधित रुग्णांकडून उपचाराकरीता घ्यावयाचे शुल्क निश्चित करण्यात आले आहे. परंतु काही खाजगी रुग्णालयाकडून कोरोनाबाधित रुग्णांकडून अतिरिक्त शुल्क घेतल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहे. या अनुषंगाने नागरिकांच्या तक्रारी या कार्यालयास प्राप्त होवून कमीत कमी कालावधीत तक्रारीचे निराकरण व्हावे याकरीता covid१९takrar@gmail.com हा ईमेल आयडी व 7276190790 हा व्हॉट्सॲप क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे.
नागरीकांनी अतिरिक्त स्वरुपात शुल्क घेतल्याची तक्रार वरील ईमेल आयडी / व्हॉटस्ॲप क्रमांकावर पाठवावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे यांनी केले आहे.
०००००००

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….