यवतमाळ जिल्हाधिकारी यांची बदली ; अमोल येडगे यवतमाळचे नवे जिल्हाधिकारी
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह :
यवतमाळ :
जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी अमरावती जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अप्पर मुख्य सचिव यांनी बदलीचे आदेश काढले आहेत. जिल्हाधिकारी यांच्या अचानक बदलीच्या आदेश धडकल्याने जिल्हा प्रशासनात खळबळ उडाली आहे.

जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी यवतमाळ जिल्हाधिकारी पदाची सूत्रे १५ फेब्रुवारी २०२० रोजी स्वीकारली होती.त्यांनी यवतमाळ जिल्ह्यात १४ महिने आपले कर्तव्य पार पाडले. कोरोनाच्या संकट काळात कोरोना सक्रिय असलेल्या वॉर्डांत प्रत्येक्षात जाऊन रुग्णांची विचारपूस करून सर्वसामान्य नागरिकांच्या हृदयात जागा निर्माण करणारे एकमेव अधिकारी ठरले.जिल्ह्याची सूत्रे प्रामाणिक पणे सांभाळली.अमोल येडगे (भाप्रसे ) २०१७ च्या बॅच चे अधिकारी असून यवतमाळ जिल्हाधिकारी पदाची सूत्र सांभाळणार आहेत.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….