१२ गुंठ्यात पेरूच्या बागेने परिसर नयनरम्य ; कृषी अधिकाऱ्यांनी दिली युवा शेतकर्याच्या पाठीवर कौतुकाची थाप
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
रियाज पारेख :९६३७८८६७७७
महागाव :
येथे तरुण शेतकऱ्याने आपल्या घरीच बारा गुंठ्यांत पेरूची बाग व आंब्याची झाडे लावल्याने परिसर नयनरम्य दिसत असल्याने ये जा करणाऱ्या नागरिकांच्या नजरा या सुंदर अशा पेरूच्या बागेकडे खेचत आहे. हा नयनरम्य परिसर डोळ्यांमध्ये भरून घेत असल्याचे निदर्शनास येताच कृषी अधिकारी व त्यांच्या टीमने तरुण शेतकरी सागर नरवाडे यांच्या पेरुच्या बागेची पाहणी करून कौतुकाची थाप युवा शेतकरी सागर नरवाडे ला दिली व मार्गदर्शन केले.
यावेळी कृषी अधिकारी विजय मुखाडे यांच्यासह मंडळाधिकारी कैलास राठोड ,नंदकुळे उपस्थित होते .युवा शेतकरी सागर नरवाडे यांनी सरदार व ललित या जातीची पेरूची १३५ झाडे ९ बाय ४ वर घरीच बाग करून लावली जेणे करुन परिसरातिल नागरिकांना ऑक्सिजनचा तुटवडा हि भासणार नाही हि बाब हि निदर्शनास आणून दिली.तसेच ही बाग सेंद्रिय असून या पेरूवर कोणत्याही रासायनिक खतांचा मारा केला नसल्याचे सागर नरवाडे यांनी सांगितले.केवळ बकऱ्याची लेंडीखत व बकऱ्याच्या शारवटचा उपयोग केला असल्याचे सागर नरवाडे यांनी सांगितले .
“घर तिथे झाड लावावे” : विजय मुखाडे ,तालुका कृषी अधिकारी
निसर्गाचा समतोल बिघडत असल्याने हवेमध्ये ऑक्सिजनचे प्रमाणही कमी झाले असल्याने पाहिजे त्या प्रमाणात ऑक्सिजन न मिळाल्याने वृद्धांनी अखेरचा श्वास घेतल्याच्या घटना उजागर आहेत शासन करोडो रुपये खर्च करून झाडे लावा झाडे जगवा चा उपक्रम राबवत अाहे परंतु जंगले नामशेष होताना दिसत असून शेताच्या बांधावर ही झाडे अल्प प्रमाणात दिसत असल्याने निसर्गाचा समतोल बिघडला आहे हे पाहता घर तिथे झाडे लावा जेणेकरून निसर्गाचा समतोल बिघडणार नाही.