६६६ जागेसाठी १७०३ नामनिर्देशन अर्ज पात्र ; २० अपात्र ; ४ जानेवारीला अर्ज मागे घेता येणार ; चिचपाड ग्रा.पं. अविरोध होण्याचे संकेत
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
रियाज पारेख :९६३७८८६७७७
महागाव :
ग्रामपंचायत निवडणुकि करिता नामनिर्देशन अर्ज भरण्याची मुदत संपली आहे.ही निवडणूक महागाव तालुक्यातील ७३ ग्रामपंचायतीत ६६६ जागेकरिता करिता होणार असून त्यासाठी तब्बल १७२३ उमेदवारांनी नामांकन दाखल केले आहेत.. छाननीत २० नामनिर्देशन पत्र विविध कारणांनी अपात्र ठरविण्यात आली आहे.तर उर्वरित १७०३ अर्ज पात्र ठरविण्यात आली आहे.४ जानेवारी ला अर्ज मागे घेता येणार आहे.तर तालुक्यातील चिचपाड ग्रामपंचायत अविरोध होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
महागाव तालुक्यातील ग्रामीण भागात आपले अस्तित्व सिद्ध करण्यासाठी अनेकांनी राजकारणात उडी घेतली आहे.त्यात तरुणांचा मोठा सहभाग असल्याचे दिसते.तालुक्यातील ७३ ग्रामपंचायत करिता ही निवडणूक होणार आहे.त्यात एक लाख २५ हजार ९५८ मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेतं.त्यात ६६२२९ पुरुष ,५९७२८ स्त्री आणि एक तृतीयपंथी यांचा समावेश आहे.
महागाव तालुक्यातील चिचपाड येथील सात जागेकरिता प्रत्येकी एकच नामांकन अर्ज प्राप्त झाल्याने चिचपाड येथील ग्रामपंचायत निवडणूक ही अविरोध होण्याची शक्यता आहे .मात्र हे चित्र ४ जानेवारी नंतरच स्पष्ट केल्या जाईल अशी माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले .तर महागाव तालुक्यातील ६६६ जागेसाठी होणाऱ्या निवडणुकीत १५ जगेकरिता प्रत्येकी एक अर्ज आल्याने ह्या जागा बिनविरोध होण्याची अधिक शक्यता आहे .मात्र हे ४ जानेवारी नंतर अधिकृत घोषणा होण्याची अधिक शक्यता आहे.
ह्या जागेवर प्रत्येकी एकच नामांकन दाखल :
वडद येथील वार्ड क्र.१,२ बोरी ४,५,भांब ३, पिंपळगाव १,३, इजनी २,हिवरा ५, डोंगरगाव १, पेढी ४, माळेगाव ३ आणि चिपपाड येथील ७ जागेकरिता वार्ड क्रमांक १,२,३ मध्ये प्रत्येकी एक असे ७ नामांकन अर्ज दाखल झाले आहेत.