पेट्रोल-डिझेल दरवाढ, तुटवड्याने शेतकरी अडचणीत; मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, जागतिक संकट अन् मागणीही वाढलीय…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “देशात १० दिवसात चौथ्यांदा पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ करण्यात आलीय. आतापर्यंत साडे सात रुपये इतकी वाढ झाली आहे. इंधन तेलाच्या दरवाढीबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांना विचारले असता त्यांनी हे जागतिक संकट असल्याचं सांगितलं.
अनेक देशात पेट्रोल डिझेल अभावी इमर्जन्सीही घोषित केलीय. तरीही भारतात पेट्रोल डिझेल सरकार उपलब्ध करून देतंय असं फडणवीस म्हणाले.
सर्वांना माहितीय जागतिक संकट आहे.पुरवठा साखळी विस्कळीत झाली असताना जगात अनेक देशांनी पेट्रोल डिझेलची इमर्जन्सी घोषीत केलीय. काही देशांमध्ये लॉकडाऊनसारखी स्थिती आहे. तरीही भारतात सरकार पेट्रोल डिझेल उपलब्ध करून देत आहे असं मुख्यमंत्री म्हणाले.
खरीप हंगाम तोंडावर असताना शेतकऱ्यांसमोर इंधन तुटवड्याचं आणि महागाईचं संकट आ वासून उभा राहिलं आहे. याबद्दलही मुख्यमंत्री फडणवीस यांना विचारण्यात आले. यावर फडणवीस म्हणाले की, सध्या शेतकरीही डीझेलची मागणी करतायत. सामान्यपणे कॅनमध्ये इंधन दिलं जात नाही. तरीही शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी कॅनमधून इंधन देण्याची सूट दिलीय. मात्र शेतकऱ्यांच्या नावे कुणी साठा करू नये यासाठी प्रसासन प्रयत्न करतंय.
इंधनाच्या साठेबाजी आणि पुरवठ्याबाबत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, गेल्या वर्षी इतकाच सध्या साठा आहे. पण पुढे मिळेल की नाही या भीतीने मागणी वाढलीय. मागणीत सध्या २० टक्के वाढ झाली आहे. लोकांना आवाहन आहे की पुरवठ्यावर ताण येईल अशी साठेबाजी करू नये. सर्व जिल्हाधिकार्यांना सुचना दिल्या आहेत. काही ठिकाणी हिंसक प्रवृत्ती दिसतेय. तिथं पोलिसांनाही सांगतिलं आहे. विनाकारण हिसा करत असतील तर त्यावर कारवाई करू असा इशारासुद्धा मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कारकिर्दीला १२ वर्षे पूर्ण होतायत. तर दुसरीकडे महागाईचा भडका उडाला आहे. यावरून विचारलेल्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, गेल्या १२ वर्षांत महागाईचा निर्देशांक हा सर्वात खाली होता. जागतिक परिस्थितीमुळे आपल्याला झळ बसतेय. त्यावरही उपाययोजना मोदीजी करतायत, करणार आहेत आणि होईल.
आंबेनळी घाटात स्कॉर्पिओ कार दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू झाला आहे. सातारा तालुक्यातल्या आसनगाव इथले सर्वजण आहेत. या दुर्घटनेबाबत प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, घटनास्थळी सध्या काम सुरू आहे. तिघांचे मृतदेह सापडले आहेत. इतरांना शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. घडलेली घटना ही अत्यंत दुर्दैवी आहे. खरंतर या अपघाताची माहिती कुणालाच नव्हती. बेपत्ता झाल्यानंतर शोध घेताना अपघात झाल्याचं लक्षात आलं असंही मुख्यमंत्री म्हणाले.
नीट विद्यार्थ्यांच्या आत्महत्येबाबतच्या प्रश्नावर फडणवीस म्हणाले की, ज्या लोकांनी नीटमध्ये मीठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न केला त्यांनी विद्यार्थ्यांसोबत अन्याय केलाय. आता केंद्र सरकारने दखल घेतली आहे. तपास यंत्रणेनं याची पाळेमळे खणून काढली आहेत. पुढची नीटची परीक्षा सुरळीत पार पडेल.
विधान परिषदेच्या जागांबाबत महायुतीची चर्चा सुरू असल्याचं सांगताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, साधारणपणे शिवसेनेसोबत नाशिक आणि संभाजीनगर या दोन जागांवर चर्चा चाललेली आहे. तर राष्ट्रवादीसोबत पुणे या जागेवर चर्चा चललीय. अजून मार्ग निघालेला नाही पण चर्चेनंतर मार्ग निघेल.

परप्रांतीयांचे धाबे दणाणले..! रिक्षा चालकांना मराठी येतं का..? तपासणी सुरु; 15 ऑगस्टनंतर थेट….
जम्मू-काश्मीरमध्ये रोपवे हवेत अचानक बंद, ३०० पर्यटक अडकले; रेस्क्यू ऑपरेशन जारी….
काँग्रेसमध्ये चाललंय काय..? ७० नगरसेवक अचानक संपर्काबाहेर, राज्यातील राजकारणात मोठी खळबळ….
अहिल्यानगरच्या पोलीस मुख्यालयात प्रशिक्षणावेळी हँड ग्रेनाईडचा स्फोट; 4 जण जखमी..…
महाराष्ट्रात दुहेरी संकट..! ३ जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी, नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन….
संसदेतील उत्कृष्ट कामगिरीची दखल ; महाराष्ट्रातील 5 खासदारांना जाहीर झाला प्रतिष्ठेचा संसदरत्न’ पुरस्कार…
पेट्रोल-डिझेल दरवाढ, तुटवड्याने शेतकरी अडचणीत; मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, जागतिक संकट अन् मागणीही वाढलीय…