आमदार रवि राणांची काँग्रेस नेत्यांसोबत ‘मसलत’ भाजपमध्ये पुन्हा ‘पाडापाडी’ची भीती….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
अमरावती :- “स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीची घोषणा होताच जिल्ह्याच्या राजकारणात अत्यंत नाट्यमय आणि छुप्या घडामोडींना वेग आला आहे. मनपा आणि नगरपरिषद निवडणुकांमध्ये भाजपचा त्यांच्याच सत्तेतील ‘मित्राकडून’ घात झाला होता, हे निकालाअंती स्पष्ट झाले होते.
आता नेमकी तीच भीती भाजपच्या गोटात पुन्हा निर्माण झाली आहे.
आमदार रवि राणा यांनी बंधू सुनील राणा यांच्या विजयासाठी थेट महाविकास आघाडीच्या गोटात गुप्त ‘फिल्डिंग’ लावल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे. राणा यांनी चक्क काँग्रेसच्या बड्या नेत्यांशी सलगी वाढविली आहे.
महापालिकेत ‘त्या’ दगाफटक्याची पुनरावृत्ती ?
महापालिका निवडणुकीत आ. रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाने भाजपच्या अनेक दिग्गजांना पराभूत करण्याची किमया केली होती. अनेक महत्त्वाच्या प्रभागांमध्ये भाजप आणि ‘वायएसपी’ एकमेकांसमोर थेट शड्डू ठोकून लढले होते.
पाडापाडीच्या राजकारणाचा फटका बसल्यामुळेच भाजपला अवघ्या २५ जागांवर समाधान मानावे लागले होते, तर युवा स्वाभिमानने मोठी झेप घेत १५ जागांवर विजय मिळविला होता. जरी सध्या महापालिकेत महायुतीची सत्ता असली आणि त्यात ‘वायएसपी’ सह अजित पवार गट सोबत असला, तरी निवडणुकीतील त्या दगाफटक्याची सल भाजप नेत्यांच्या मनात कायम आहे.
महायुतीच्या उमेदवारीची उत्सुकता टांगणीला
अमरावती लोकल बॉडी निवडणुकीत महायुतीची उमेदवारी प्रवीण पोटे पाटील यांनाच दिली जाईल, असे संकेत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दोन ते तीन जाहीर कार्यक्रमातून दिले आहेत. दोन टर्मची आमदारकी, राज्यमंत्रीपद, संघटनेवर मजबूत पकड या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत.
यापूर्वीची निवडणूक त्यांनी एकहाती जिंकली होती. तर दुसरीकडे भाजपच्या शिर्षस्थ नेतृत्वासोबतही त्यांची सलगी आहे. त्यामुळे पोटे पाटील यांना ही तिसऱ्यांदा महायुतीची उमेदवारी मिळू शकते, असे बोलले जात आहे.
महायुतीमधील राष्ट्रवादी अजित पवार व शिंदेसेनेच्या स्थानिक नेतृत्वाशीदेखील त्यांची सलगी आहे. त्यामुळे महायुतीच्या उमेदवारीची उत्सुकता टांगणीला लागली आहे.

गोवंश तस्करांनी केली बजरंग दल कार्यकर्त्याची दगडांनी ठेचून निर्घृण हत्या ; सुकळी गावात मध्यरात्री घडला काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार…
लडाखमध्ये लष्कराचे ‘चीता’ हेलिकॉप्टर डोंगराला धडकले, मेजर जनरल थोडक्यात बचावले; दोन्ही पायलट जखमी….
कॉकरोच जनता पार्टीवर कारवाई; एक्स, इन्स्टानंतर वेबसाईटवरही बंदी…
पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ, चेक करा नवे दर…
दहावी पास विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, बोर्डाने घेतला मोठा निर्णय…
उद्धव ठाकरेंनी फसवलं..? बच्चू कडू यांचा खळबळजनक गौप्यस्फोट…