अभिनेत्री उषा चव्हाण यांच्याकडून पुरस्कार परत, पुण्यातील ‘टीडीआर’ प्रकरणी नाराजी ; उपमुख्यमंत्री शिंदेंनी घेतला मोठा निर्णय….!
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांनी पुण्यातील धनकवडी येथील टीडीआर प्रकरणावरून प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत शासनाचा जीवनगौरव पुरस्कार परत केला. ठाण्यातील आनंदाश्रम येथे आनंद दिघे यांच्या प्रतिमेसमोर हा पुरस्कार ठेवून त्यांनी संताप व्यक्त केला.
आयुष्यभर महाराष्ट्राच्या संस्कृतीसाठी काम केले, तरीही न्यायासाठी दरवाजे ठोठवावे लागत आहेत,” अशा शब्दांत त्यांनी खंत व्यक्त केली.
उषा चव्हाण यांच्या म्हणण्यानुसार, कुटुंबीयांच्या मालकीची पुण्यातील धनकवडी येथील जमीम अद्याप अविभाजित असताना आणि न्यायालयाने त्यांचा मुलगा हृदयनाथ कडू देशमुख यांचा हिस्सा मान्य केला असतानाही पुणे महापालिकेकडून खासगी विकसकाच्या फायद्यासाठी ‘टीडीआर’ मंजूर करण्यात आला. न्यायालयीन आदेश आणि आमचे कायदेशीर हक्क दुर्लक्षित करण्यात आले, असा आरोप त्यांनी केला.
उपमुख्यमंत्री शिंदेंकडून व्यवहाराला स्थगिती
उषा चव्हाण यांनी शिवसैनिकांसमोर आपली व्यथा मांडल्यानंतर अभिनेते-निर्माते मंगेश देसाई यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत हा विषय पोहोचवला. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी नगरविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डी. गोविंदराज यांच्याशी संपर्क साधून संबंधित टीडीआर व्यवहाराला तात्पुरती स्थगिती देण्याचे निर्देश दिले.

घड्याळाची टिक टिक सुरु, हालचाल सुरु करा अन्यथा काहीच राहणार नाही, ट्रम्प यांची इराणला धमकी…
सोलापूरचा महेंद्र ‘हिंद केसरी’; थारसह पटकावली चांदीची गदा, पुण्याचा पृथ्वीराज उपविजेता…..
महाराष्ट्र सरकारचा मोठा डिजिटल निर्णय; मंत्रिमंडळ बैठकींना आता ‘ऑनलाईन’ हजेरीची मुभा….
महाराष्ट्रात पुन्हा निवडणुकांचे पडघम; विधानपरिषदेच्या १६ जागांसाठी निवडणूक तारखांची घोषणा, मतदारसंघांची संपूर्ण यादी…
NEET पेपरफुटी प्रकरणात मोठा ट्विस्ट, लातूरमधील नामांकित प्राध्यापक शिवराज मोटेगावकर CBI च्या ताब्यात…
विदर्भाला उष्णतेच्या लाटेचा चटका, अकोला-वर्धा ४६ अंशावर ; चार दिवस “यलो अलर्ट”
अभिनेत्री उषा चव्हाण यांच्याकडून पुरस्कार परत, पुण्यातील ‘टीडीआर’ प्रकरणी नाराजी ; उपमुख्यमंत्री शिंदेंनी घेतला मोठा निर्णय….!