पुढील वर्षापासून नीट परीक्षा संगणक-आधारित असेल’ शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची घोषणा….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज (15 मे) नीट पेपरफुटी प्रकरणासंदर्भात पत्रकार परिषद घेतली. त्यांनी सांगितले की विद्यार्थ्यांचे कल्याण हे सरकारचे प्राधान्य आहे.
काही लोक सोशल मीडियावर चुकीची माहिती पसरवत आहेत. पत्रकार परिषदेदरम्यान, धर्मेंद्र प्रधान यांनी पुढील वर्षापासून नीट परीक्षेत मोठ्या बदलांची घोषणा केली. त्यांनी सांगितले की, पुढील वर्षापासून नीट परीक्षा ओएमआर शीटऐवजी संगणक-आधारित असेल. त्यांनी पुढे सांगितले की, नीट-यूजी पुनर्परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीचे शहर निवडायला एक आठवड्याचा वेळ मिळेल. प्रवेशपत्रे 14 जूनपर्यंत जारी केली जातील.
नीट पेपरफुटी प्रकरणावर धर्मेंद्र प्रधान काय म्हणाले?
7 मे रोजी, एनटीएला (NTA) असा आक्षेप प्राप्त झाला की, या वर्षीच्या प्रश्नपत्रिकेत अंदाजपत्रिकेतील काही प्रश्न आले आहेत. एनटीए आणि सरकारने तत्काळ या प्रकरणाची चौकशी केली. शासकीय यंत्रणांशी संपर्क साधण्यात आला. जेव्हा हे स्पष्ट झाले की यावेळी प्रश्नपत्रिका फुटली आहे, तेव्हा शिक्षण माफियांच्या कटामुळे गुणवंत विद्यार्थ्यांचे कोणतेही नुकसान होऊ नये, असे आम्हाला वाटले. त्यामुळे, आम्ही 12 मे रोजीची परीक्षा रद्द केली.
कोणतीही अनियमितता खपवून घेतली जाणार नाही
ते पुढे म्हणाले, “आम्ही आज (15 मे) परीक्षेची नवीन तारीख जाहीर केली आहे. हा परीक्षा माफिया आणि समाजकंटकांविरुद्धचा दीर्घकालीन लढा आहे. सरकारने तपास सीबीआयकडे सोपवला आहे. सीबीआयने कारवाई सुरू केली असून, यावेळी सीबीआय कठोर कारवाई करेल. सर्व विभागांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. यावेळी आम्ही कोणतीही अनियमितता खपवून घेणार नाही. हा निर्णय विद्यार्थ्यांच्या सर्वोत्तम हितासाठी घेण्यात आला आहे.”
एनटीए 21 जून रोजी होणार
दरम्यान, नीट (यूजी) 2026 परीक्षा आता 21 जून रोजी होणार आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) ने परीक्षेची नवीन तारीख जाहीर केली. ही परीक्षा मूळतः 3 मे रोजी होणार होती, परंतु पेपरफुटीमुळे ती रद्द करण्यात आली होती.

पेपरफुटीमुळे रद्द झालेल्या NEET ची पुर्नपरीक्षा आता 21 जूनला होणार; NTA कडून घोषणा…..
राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात हालचालींना वेग, सुनेत्रा पवारांचा निकटवर्तीय अचानक प्रफुल पटेलांच्या भेटीला, नेमकं काय घडलं..?
कांद्याला 2 हजार प्रतिक्विंटल हमीभाव आणि नुकसानीची भरपाई प्रति क्विंंटल 1500 रुपये अनुदान द्या ; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी….
चांदी १० हजारांनी स्वस्त, सोन्याच्या किमतीतही घसरण; पाहा दिल्ली, मुंबईसह अन्य शहरांतील दर….
देशात आर्थिक मंदीचा धोका..? शरद पवारांनी उपस्थित केला गंभीर प्रश्न; मोदींना दिली ‘ही’ महत्त्वाची सूचना….
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या घडामोडींना वेग, थेट गुप्त बैठक….
पुढील वर्षापासून नीट परीक्षा संगणक-आधारित असेल’ शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची घोषणा….