राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या घडामोडींना वेग, थेट गुप्त बैठक….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची सुत्रे सुनेत्रा पवार यांनी आपल्या हाती घेतली. अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलीनीकरणाबाबत चर्चा सुरू होती असा खुलासा शरद पवार यांच्याकडून करण्यात आला होता.
रोहित पवार देखील याबाबत अनेकदा बोलताना दिसले. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्यांकडून अशी कोणतीही चर्चा सुरू नव्हती, असे स्पष्ट केले. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत सतत चर्चा पुढे येते. मात्र, यावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी काहीच भाष्य केले नाही. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून सातत्याने दोन्ही पक्षाच्या विलीनीकरणाबाबत भाष्य केले जाते. यादरम्यानच आता मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहे. यासंदर्भातील एक गुप्त बैठकही पार पडली.
शरद पवार गटाच्या प्रमुख नेत्यांची पुण्यात गुप्त बैठक पार पडली. या बैठकीला प्रमुख नेते उपस्थित होते. हेच नाही तर विलीनीकरणाच्या मुद्द्यावर चर्चा झाली. बैठकीला माजी मंत्री अनिल देशमुख, खासदार अमोल कोल्हे, हर्षवर्धन पाटील, शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, जयंत पाटील, राजेश टोपे, बाळासाहेब पाटील, शरद पवार गटाचे पुणे जिल्हाध्यक्ष देवदत्त निकम उपस्थित उपस्थित होते.
काही काळ ही बैठक सुरू होती. ही बैठक पक्षाच्या कार्यालयात झाली नाही तर एका हॉटेलमध्ये पार पडली. राष्ट्रवादी काँग्रेसमधील घडामोडींवर बैठकीत महत्त्वपूर्ण आहे. हेच नाही तर सुनील तटकरे यांनीही दोन दिवसांपूर्वी अचानक शरद पवार यांची भेट घेतली. तब्बल दोन वर्षांपेक्षा अधिक काळानंतर सुनील तटकरे शरद पवार यांच्या भेटीकरिता पोहोचले होते.
सुनील तटकरे यांनी शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर माध्यमांसोबत बोलताना सांगितले की, शरद पवार यांच्या तब्येतीची विचारपूस करण्याकरिता मी आलो होतो. पुण्यात पार पडलेल्या या गुप्त बैठकीत सुनील तटकरे आणि शरद पवार यांच्या भेटीबाबतही चर्चा झाली. राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर बैठकीत चर्चा झाल्याची माहिती माहिती मिळत आहे. या बैठकीनंतरचा एक फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आता दोन्ही पक्ष एकत्र येणार का? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

चांदी १० हजारांनी स्वस्त, सोन्याच्या किमतीतही घसरण; पाहा दिल्ली, मुंबईसह अन्य शहरांतील दर….
देशात आर्थिक मंदीचा धोका..? शरद पवारांनी उपस्थित केला गंभीर प्रश्न; मोदींना दिली ‘ही’ महत्त्वाची सूचना….
मानसिक आरोग्याबाबत जनजागृती करणारा लढवय्या हरपला, ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ डॉ आनंद नाडकर्णी यांचं निधन….
स्पर्धा परीक्षार्थींसाठी मोठी बातमी! सवलत घेणाऱ्या राखीव उमेदवारांना ‘ओपन’मधून संधी नाही; मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय….
‘HSRP’नंबर प्लेटसाठी पुन्हा एकदा मुदतवाढ, आता ‘या’ तारखेपर्यंत मुदत, नियम मोडल्यास…
महागाईचा भडका, पेट्रोल-डिझेलच्या दरात 3.14 रुपयांनी वाढ..?
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या घडामोडींना वेग, थेट गुप्त बैठक….