महागाईचा भडका, पेट्रोल-डिझेलच्या दरात 3.14 रुपयांनी वाढ..?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “महागाईचा बॉम्ब फुटला आहे आणि मोठा भडका उडाला आहे. याचं कारण म्हणजे पीएम मोदी यांनी सोनं चांदी खरेदी करून नका, इंधनाची, विजेची बचत करा असं आवाहन केल्यानंतर सगळ्याचे दर वाढले आहेत.
महागाईचा भडका
CNG चे दर 2 रुपयांनी वाढले, सोन्या चांदीच्या दरात इंपोर्ट ड्युटी 15 टक्के करण्यात आली. दुधापासून ते गॅस सिलिंडरपर्यंत सगळ्या गोष्टी महाग झाल्या आहेत. आता त्यापाठोपाठ पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले आहेत.
भीती अखेर खरी ठरली
गेल्या काही दिवसांपासून व्यक्त केली जाणारी भीती अखेर खरी ठरली आहे. पश्चिम आशियातील वाढता तणाव आणि युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधन पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला असून, त्याचे चटके आता थेट भारतीय ग्राहकांना सोसावे लागणार आहेत. आज, शुक्रवारी सकाळी ६ वाजेपासून दिल्लीसह देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत मोठी वाढ करण्यात आली आहे.
किती झाली दरवाढ?
इंधन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर ३ रुपयांहून अधिक वाढ केली आहे. पेट्रोलचे दर 3 रुपये 14 पैसे तर डिझेलचे दर 3 रुपये 11 पैशांनी वाढवण्यात आल्याचं जाहीर केलं आहे.
दरवाढीमागे कारण काय?
दिल्ली पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे मावळते अध्यक्ष निश्चल सिंघानिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत होणारी मोठी वाढ आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाची होत असलेली घसरण ही या दरवाढीमागची मुख्य कारणे आहेत. तेल कंपन्यांनी गुरुवारी मध्यरात्रीच पेट्रोल पंप चालकांना ईमेलद्वारे या दरवाढीची सूचना दिली होती.
खिसा रिकामा होणार
याचा थेट परिणाम लोकांच्या खिशावर होणार आहे. महागाई वाढत आहे मात्र लोकांची मजुरी, पगार वाढत नसल्याने मोठं संकट ओढवलं आहे. डिझेल महागल्यामुळे मालवाहतुकीचे दर वाढतील, परिणामी भाजीपाला आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढण्याची शक्यता आहे.दररोज दुचाकी किंवा चारचाकीने प्रवास करणाऱ्या नोकरदारांचे महिन्याचे बजेट कोलमडणार आहे.वाहतुकीवर अवलंबून असणाऱ्या छोट्या उद्योजकांनाही या वाढीव किमतींचा अतिरिक्त बोजा सहन करावा लागेल.
पश्चिम आशिया हे जगातील इंधन पुरवठ्याचे सर्वात मोठे केंद्र आहे. तिथल्या युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत झाली असून, कच्च्या तेलाचे भाव कडाडले आहेत. जोपर्यंत तिथली परिस्थिती शांत होत नाही, तोपर्यंत इंधन दरातील ही अस्थिरता कायम राहण्याची चिन्हे आहेत.

‘HSRP’नंबर प्लेटसाठी पुन्हा एकदा मुदतवाढ, आता ‘या’ तारखेपर्यंत मुदत, नियम मोडल्यास…
पवार कुटुंबात मोठी फूट…! रोहित पवार लवकरच काँग्रेसमध्ये जाणार,अजितदादांच्या जवळच्या नेत्याच्या दाव्याने मोठी खळबळ….
सिंधुरत्न समृद्ध योजना 2.0 सुरू राहणार, संत्रा आयात शुल्क परतावा योजना रद्द…; कॅबिनेटच्या बैठकीत राज्य सरकारचे 14 धडाकेबाज निर्णय..…
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चेनंतरच आनंद परांजपेंचा पक्षप्रवेश; उदय सामंत यांचे स्पष्टीकरण…..
मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर मोर्चा नेणारच – राजू शेट्टी…..
राज्यातील ‘या’ दोन जिल्ह्यांत तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा ; यलो अलर्ट जाहीर…..
महागाईचा भडका, पेट्रोल-डिझेलच्या दरात 3.14 रुपयांनी वाढ..?