पश्चिम आशियात जैसे थे..! ; अमेरिकेला युद्धसमाप्तीच्या प्रस्तावावर इराणच्या उत्तराची प्रतीक्षा…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- “होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यावरून गुरुवारी आणि शुक्रवारी इराण-अमेरिकेने एकमेकांवर हल्ले केल्यानंतर शनिवारी या सागरी भागात तुलनेने शांतता राहिली. युद्धसमाप्ती आणि शांतता चर्चेसाठी अमेरिकेने दिलेल्या प्रस्तावावर इराणने अद्याप उत्तर दिलेले नाही.
इराणकडून आपल्याला काही तासांमध्ये प्रतिसाद अपेक्षित आहे, असे अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ यांनी शुक्रवारी सांगितले होते. मात्र, एक दिवस उलटून गेल्यानंतरही इराणकडून कोणतीही हालचाल दिसत नाही.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुढील आठवड्यात बहुप्रतिक्षित चीन दौऱ्यावर जात आहेत. त्यापूर्वी पश्चिम आशियातील संघर्ष कमी करण्यासाठी त्यांच्यावर मोठा दबाव आहे. या युद्धामुळे जागतिक इंधन बाजारात बरीच उलथापालथ झाली असून त्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेलाही धोका निर्माण झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर, चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्याशी चर्चा करताना ट्रम्प यांच्याकडे ठोस मुद्दा असणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने ते इराणवर चर्चेसाठी दबाव वाढवत आहेत. इराणला दिलेल्या प्रस्तावामध्ये अणुकार्यक्रमावरील चर्चेचाही समावेश आहे.
इराणच्या माध्यमांनी दिलेल्या वृत्तांनुसार, शुक्रवारी इराणी सैन्य आणि अमेरिकेच्या नौदलाच्या जहाजांमध्ये संघर्ष झाला. त्यानंतर परिस्थिती निवळल्याचे सांगण्यात आले असले तरी अशा प्रकारचा संघर्ष पुन्हा होण्याची भीती आहे. अमेरिकी नौदलाची नाकेबंदी भेदून इराणच्या बंदरांकडे जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन इराणी जहाजांवर हल्ला करून त्यांना माघार घेण्यास भाग पाडल्याचे अमेरिकी लष्कराने सांगितले.
नाकेबंदीमुळे नुकसान नाही?
इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद केल्याच्या प्रत्युत्तरादाखल अमेरिकेने गेल्या महिन्यात इराणी बंदरांची नाकेबंदी केली आहे. मात्र, आणखी चार महिने तरी या नाकेबंदीमुळे इराणचे नुकसान होणार नाही, असे सीआयए या अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेने सूचित केले आहे. या प्रकरणाची माहिती असलेल्या एका अमेरिकी अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे. यामुळे ट्रम्प यांच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. दुसरीकडे, सीआयएच्या विश्लेषणासंबंधी केले जाणारे दावे खोटे असल्याचे एका वरिष्ठ गुप्तचर अधिकाऱ्याने सांगितले.

निदा खानला आश्रय देणं भोवलं, MIM नगरसेवक मतीन पटेल यांच्या मालमत्तांवर छ. संभाजीनगर मनपाचा ‘बुलडोजर’
२२ आमदार घेऊन सुनिल तटकरे आणि प्रफुल पटेल ‘भाजपा’मधून लढणार ; रोहित पवारांचा मोठा दावा….
सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल भाजपमधूनच लढणार ; २२ आमदारही भाजपच्या वाटेवर, रोहित पवारांचा गौप्यस्फोट….
तामिळनाडूमध्ये मोठा धक्का, बहुमत चाचणीत विजय यांना १४४ आमदारांचा पाठिंबा ; एआयएडीएमके मध्ये फूट….
उदगाव बायपासवर पेट्रोलचा टँकर उलटला, १० हजार लिटर पेट्रोल सांडले….
इम्तियाज जलील हेच अर्बन टेररिस्ट! निदा खानला त्यांनीच लपवलं’; संजय शिरसाटांचा थेट हल्ला….