निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील..? ; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “नाशिकच्या टीसीएस कंपनीतील अत्याचार व कथित सक्तीच्या धर्मांतर प्रकरणात (कार्पोरेट लव्ह जिहाद) छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी नाशिक पोलिसांच्या मदतीने मोठी कारवाई केली.
या प्रकरणातील फरार महिला आरोपीला शहरातील नारेगावातून अटक करण्यात आली. यानंतर निदा खानला न्यायालयासमोर हजर करण्यात आले. तिला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणी AIMIM पक्षाचे नगरसेवक मतिन पटेलवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी आता राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
नाशिक शहरातील चर्चेत असणारे TCS धर्मांतरण आणि अत्याचार प्रकरणी मुख्य महिला आरोपी निदा खान हिला पोलिसांनी २५ दिवसांनंतर अटक केली. निदा खान पोलिसांना गुंगारा देत छत्रपती संभाजीनगर येथील नारेगाव परिसरात लपून बसली होती. निदा खान हिला लपण्यासाठी मदत करत असल्याच्या आरोपाखाली छत्रपती संभाजीनगरचे AIMIM पक्षाचे नगरसेवक मतिन पटेल याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पत्रकारांशी बोलताना असताना मुख्यमंत्री फडणवीस यांना याबाबत प्रतिक्रिया विचारण्यात आली.
CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले…
हे स्पष्टपणे दिसत आहे की, निदा खानला लपवून ठेवण्यात एमआयएमच्या नगरसेवकांचा हात होता. या सगळ्याच्या पाठीमागे कोण होते, हेदेखील शोधून काढले जाईल. अशा प्रकारे धर्मांतरणाच्या रॅकेटमध्ये ते सामील आहेत का, हे जे रॅकेट आहे, ते त्याला मदत करत आहेत का, त्यांचा याला आशीर्वाद आहे का, हे सगळे शोधले जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले.
दरम्यान, ज्या ठिकाणावरून निदा खानला पोलिसांनी ताब्यात घेतले, त्या परिसरात अनेक अवैध धंदे सुरू आहेत. भागातील एमआयएमच्या मतीन नावाच्या नगरसेवकालाही अटक करावी. छत्रपती संभाजीनगर नावाचा इम्तियाज जलील यांना पहिल्यापासून राग आहे. त्या मुलीला लपवण्यामागे मतीन पटेल आणि त्यांचे बॉस इम्तियाज जलील यांचा हात आहे, असा गंभीर आरोप करत, एमआयएमवर बंदी घालण्याची मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे करणार आहोत, असे चंद्रकांत खैरे यांनी म्हटले आहे.

‘भारत माता की जय’ बोलू पण, ‘वंदे मातरम्’ नाही, मुस्लिम नेत्याचं वादग्रस्त विधान….
“आता बंगालमध्ये…”; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले…?
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक….
काळजाचा ठोका चुकला..! एकनाथ शिंदेंचं हेलिकॉप्टर वादळात अडकलं, मुंबईत इमर्जन्सी लँडिंग…..
तामिळनाडूत राजकीय बॉम्ब, भाजपला रोखण्यासाठी DMKचा मोठा जुगार; विजय यांना CM करणार,सरकारला बाहेरून पाठिंबा….
ममता बॅनर्जींचे संपूर्ण मंत्रिमंडळ बरखास्त, मुख्यमंत्रीपदही गेलं; बंगालमध्ये अभूतपूर्व राजकीय भूकंप, राज्यपालांनी TMCची सत्ता उलथवली….
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील..? ; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले….