“आता बंगालमध्ये…”; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले…?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
कोलकाता :- “पश्चिम बंगालच्या राजकारणात आता भाजप पर्वाला सुरुवात झाली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी (८ मे २०२६) अधिकारी यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली. मुख्यमंत्री म्हणून नाव जाहीर होताच, शुभेंदू अधिकारी म्हणाले, “गेल्या अनेक वर्षांच्या मेहनतीला आज फळ मिळाले आहे.
हा बंगालच्या जनतेचा विजय आहे. तसेच, संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
पश्चिम बंगालच्या राजकारणा अल्पावधीतच आपला ठसा उमटवणारे शुभेंदू अधिकारी, आता राज्याचे नवे ‘अधिकारी’ होणार आहेत. कधीकाळी ममता बॅनर्जींचे अत्यंत विश्वासू सहकारी असलेले अधिकारी, आज त्यांचे सर्वात मोठे राजकीय विरोधक म्हणून समोर आले आहेत.
“भाषणे कमी आणि काम अधिक करण्यावर भर देईन” –
निवडीनंतर कार्यकर्त्यांचे आभार मानताना अधिकारी यांनी, टीएमसीच्या काळात मारल्या गेलेल्या ३२१ भाजप कार्यकर्त्यांचे स्मरण केले. ते म्हणाले, “भाजपने आपल्या जाहीरनाम्यातील जी काही आश्वासने दिली आहेत, ती सर्व पूर्ण करण्यासाठी सरकार काम करेल. आता बंगालमध्ये कुणालाही घाबरण्याची गरज नाही, आम्ही राज्याचा गौरव परत आणू. मी भाषणे कमी आणि काम अधिक करण्यावर भर देईन.”
“आता घुसखोरी आणि गो-तस्करी करणे अशक्य होईल” –
यावेळी अमित शाह म्हणाले, “त्रिपुरा आणि आसामनंतर आता बंगालमध्येही भाजपचे सरकार आले आहे. आता घुसखोरी आणि गो-तस्करी करणे अशक्य होईल. आम्ही बंगालच्या सीमा अभेद्य किल्ल्याप्रमाणे बनवू.” तसेच, राज्यातील २३ पैकी ९ जिल्ह्यांमध्ये ममता बॅनर्जींच्या पक्षाचा पूर्णपणे ‘सूपडा साफ’ झाला आहे. हा प्रचंड जनादेश केवळ जनता आणि ईश्वराची कृपा आहे, असेही शाह यांनी म्हटले आहे.

निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील..? ; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले….
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक….
काळजाचा ठोका चुकला..! एकनाथ शिंदेंचं हेलिकॉप्टर वादळात अडकलं, मुंबईत इमर्जन्सी लँडिंग…..
तामिळनाडूत राजकीय बॉम्ब, भाजपला रोखण्यासाठी DMKचा मोठा जुगार; विजय यांना CM करणार,सरकारला बाहेरून पाठिंबा….
ममता बॅनर्जींचे संपूर्ण मंत्रिमंडळ बरखास्त, मुख्यमंत्रीपदही गेलं; बंगालमध्ये अभूतपूर्व राजकीय भूकंप, राज्यपालांनी TMCची सत्ता उलथवली….
कलिंगडला अखेर क्लिन चिट, मुंबईतील चौघांचा मृत्यू उंदीर मारण्याच्या औषधामुळे, फॉरेन्सिक रिपोर्ट समोर….
“आता बंगालमध्ये…”; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले…?