ममता बॅनर्जींचे संपूर्ण मंत्रिमंडळ बरखास्त, मुख्यमंत्रीपदही गेलं; बंगालमध्ये अभूतपूर्व राजकीय भूकंप, राज्यपालांनी TMCची सत्ता उलथवली….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
कोलकाता :- “पश्चिम बंगालच्या राजकारणात आज मोठा राजकीय उलटफेर पाहायला मिळाला. विधानसभा कार्यकाळ संपताच राज्यपाल आर.एन.रवी यांनी संपूर्ण मंत्रिमंडळ बरखास्त केले असून त्यासोबतच ममता बॅनर्जी यांचे मुख्यमंत्रीपदही संपुष्टात आले आहे.
विशेष म्हणजे राजीनाम्यावरून सुरू असलेल्या राजकीय संघर्षादरम्यान हा निर्णय थेट घटनात्मक प्रक्रियेनुसार घेण्यात आला. त्यामुळे बंगालमधील तब्बल 15 वर्षांपासून सुरू असलेल्या सत्तेच्या अध्यायाचा अचानक अंत झाला आहे.
राज्यपालांनी घटनात्मक व्हेटोचा वापर करत सातव्या राज्य विधानसभेला बरखास्त करण्याची अधिसूचना जारी केली आहे. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 174(2)(b) अंतर्गत हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. मुख्य सचिव दुष्यंत नारियाला यांनी राज्यपालांच्या निर्देशानुसार हा आदेश जारी केल्यानंतर राज्य सरकारचे अस्तित्व संपुष्टात आले आहे. राज्यपालांच्या या कठोर निर्णयामुळे बंगालच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून मंत्रिमंडळ आणि विधानसभा दोन्ही तत्काळ प्रभावाने बरखास्त करण्यात आल्या आहेत.
ममतांचा अखेरचा राजकीय डाव फसला
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा अखेरचा राजकीय डाव अखेर फसल्याचे चित्र समोर आले आहे. विधानसभेचा कार्यकाळ आज संपणार होता. त्यानंतर संध्याकाळी राजभवनाकडून काल जारी करण्यात आलेले पत्र सार्वजनिक करण्यात आले. त्या आदेशात म्हटले आहे की, भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 174 च्या उपकलम (2)(b) अंतर्गत मला मिळालेल्या अधिकारांचा वापर करून मी 7 मे 2026 पासून पश्चिम बंगाल विधानसभा बरखास्त करत आहे.
राजीनामा देण्यास नकार
सोमवारी झालेल्या विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसचा मोठा पराभव झाल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी मंगळवारी संध्याकाळी पत्रकार परिषद घेत राजीनामा देण्यास नकार दिला होता. त्यांच्या या भूमिकेमुळे मोठा राजकीय वाद निर्माण झाला होता. भाजप नेत्यांनी त्यांना तात्काळ पदावरून हटवण्याची मागणी केली होती.
ममता बॅनर्जी यांनी निवडणुकीतील पराभव मान्य करण्यास नकार देत भाजपला मिळालेला जनादेश हा लुटीचा परिणाम असल्याचा आरोप केला होता. मी हरलेली नाही, त्यामुळे मी राजभवनात जाणार नाही. मी राजीनामा देणार नाही, असे त्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्टपणे सांगितले होते.
मात्र अखेर राज्यपालांनी घटनात्मक अधिकारांचा वापर करत विधानसभा बरखास्त केल्याने बंगालमधील राजकीय संघर्षाचा हा टप्पा संपुष्टात आला आहे.

काळजाचा ठोका चुकला..! एकनाथ शिंदेंचं हेलिकॉप्टर वादळात अडकलं, मुंबईत इमर्जन्सी लँडिंग…..
तामिळनाडूत राजकीय बॉम्ब, भाजपला रोखण्यासाठी DMKचा मोठा जुगार; विजय यांना CM करणार,सरकारला बाहेरून पाठिंबा….
कलिंगडला अखेर क्लिन चिट, मुंबईतील चौघांचा मृत्यू उंदीर मारण्याच्या औषधामुळे, फॉरेन्सिक रिपोर्ट समोर….
तामिळनाडूतील सत्ता पेच वाढला, राज्यपालांविरोधात विजय घेणार सुप्रीम कोर्टात धाव..?
महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल उद्या दुपारी 1 वाजता जाहीर होणार, बोर्डाकडून मोठी घोषणा….
थलपती विजय विरुद्ध राज्यपाल..! तामिळनाडूच्या सत्तासंघर्षात प्रकाश आंबेडकरांची उडी; ‘या’ दोन मोठ्या राजकीय घटनांचा दिला दाखला….
ममता बॅनर्जींचे संपूर्ण मंत्रिमंडळ बरखास्त, मुख्यमंत्रीपदही गेलं; बंगालमध्ये अभूतपूर्व राजकीय भूकंप, राज्यपालांनी TMCची सत्ता उलथवली….