तामिळनाडूतील सत्ता पेच वाढला, राज्यपालांविरोधात विजय घेणार सुप्रीम कोर्टात धाव..?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
चेन्नई :- “तामिळनाडू विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून ४८ तास उलटले तरी सत्तास्थापनेचा तिढा सुटलेला नाही. सर्वात मोठा पक्ष असलेल्या ‘टीव्हीके’चे (TVK) प्रमुख थलापती विजय यांनी मुख्यमंत्रीपदासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
राज्यपालांची विजय यांनी दोनदा भेट घेतली. मात्र, राज्यपालांकडून अद्यापही सत्ता स्थापन करण्याचे आमंत्रण देण्यात आले नाही. राज्यपालांनी बहुमताचा आकडा सिद्ध करण्यासाठी टाकलेल्या अटीमुळे आता विजय कायदेशीर लढाईच्या तयारीत असून, हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात जाण्याची शक्यता आहे.
भाजपपासून दोन हात लाबं… निर्णयावर विजय ठाम
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सत्तास्थापनेसाठी आवश्यक असलेल्या ‘मॅजिक फिगर’साठी (११८) विजय यांना काही आमदारांची गरज आहे. मात्र, अण्णाद्रमुक-भाजप आघाडीचा पाठिंबा घेऊन सरकार स्थापन करण्यास विजय अजिबात इच्छुक नाहीत. निलंकराई येथील त्यांच्या निवासस्थानी झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत त्यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तमिळ अस्मितेचे राजकारण करणाऱ्या विजय यांना भाजपसोबत जाऊन आपली प्रतिमा डागाळायची नसल्याचे बोलले जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
भाजपचा एकच आमदार असला तरी त्यांचा मित्रपक्ष अण्णाद्रमुकचे ४७ आमदार निवडून आले आहेत. त्यातील एका गटाने काँग्रेस-टीव्हीकेच्या युतीला दूर ठेवण्यासाठी थलापती विजयला पाठिंबा देण्याची मागणी केली आहे. अण्णाद्रमुकचे २८ आमदार हे पाँडिचेरी येथील रिसॉर्टमध्ये दाखल झाले आहेत.
कायदेशीर सल्ला आणि सुप्रीम कोर्टाचा पर्याय
राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी सर्वात मोठा पक्ष असूनही विजय यांना अद्याप सत्तास्थापनेचे निमंत्रण दिलेले नाही. याउलट आधी ११८ आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र द्या, अशी भूमिका घेतली आहे. या तांत्रिक मुद्द्यावरून टीव्हीके पक्ष आता आक्रमक झाला आहे. “बहुमत हे राजभवनात नाही तर विधानसभेच्या पटलावर सिद्ध केले जाते,” या सर्वोच्च न्यायालयाच्या जुन्या निकालांचा आधार घेत विजय हे उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण गेल्यास तामिळनाडूमधील सत्ता स्थापनेचा पेच आणखी वाढण्याची शक्यता आहे.
पुन्हा निवडणुकांचे वारे?
बैठकीत काही नेत्यांनी असेही सुचवले आहे की, जर राज्यपालांनी सत्तास्थापनेची संधी दिली नाही आणि इतर पक्षांनी घोडेबाजार सुरू केला, तर थेट पुन्हा निवडणुकांना सामोरे जाणे अधिक श्रेयस्कर ठरेल. यामुळे जनतेची सहानुभूती अधिक मिळेल, असा एका गटाचा अंदाज आहे. सध्या तामिळनाडूचे राजकारण एका वळणावर येऊन ठेपले असून, थलापती विजय यांच्या एका निर्णयाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

काळजाचा ठोका चुकला..! एकनाथ शिंदेंचं हेलिकॉप्टर वादळात अडकलं, मुंबईत इमर्जन्सी लँडिंग…..
तामिळनाडूत राजकीय बॉम्ब, भाजपला रोखण्यासाठी DMKचा मोठा जुगार; विजय यांना CM करणार,सरकारला बाहेरून पाठिंबा….
ममता बॅनर्जींचे संपूर्ण मंत्रिमंडळ बरखास्त, मुख्यमंत्रीपदही गेलं; बंगालमध्ये अभूतपूर्व राजकीय भूकंप, राज्यपालांनी TMCची सत्ता उलथवली….
कलिंगडला अखेर क्लिन चिट, मुंबईतील चौघांचा मृत्यू उंदीर मारण्याच्या औषधामुळे, फॉरेन्सिक रिपोर्ट समोर….
महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल उद्या दुपारी 1 वाजता जाहीर होणार, बोर्डाकडून मोठी घोषणा….
थलपती विजय विरुद्ध राज्यपाल..! तामिळनाडूच्या सत्तासंघर्षात प्रकाश आंबेडकरांची उडी; ‘या’ दोन मोठ्या राजकीय घटनांचा दिला दाखला….