शिवाजीराव पाटील यांच्यावर शंभर कोटींचा दावा दाखल करणार :- हसन मुश्रीफ….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “नोटाबंदीच्या काळात हसन मुश्रीफ यांनी स्वतःकडील कोट्यवधी रुपये जिल्हा बँकेत आणून बदलून घेतल्याने बँक अडचणीत आल्याचा बदनामीकारक आरोप आमदार शिवाजीराव पाटील यांनी मंगळवारी केला होता.
त्यांनी आठ-दहा दिवसांत याबाबतचे पुरावे द्यावेत, अन्यथा त्यांच्यावर शंभर कोटी रुपयांचा बदनामीचा फौजदारीचा दावा न्यायालयात दाखल करणार असल्याचा इशारा मंत्री हसन मुश्रीफ यांनी बुधवारी पत्रकातून दिला.
मंत्री मुश्रीफ पत्रकात म्हणतात, आमदार पाटील हे गेल्या पाच वर्षात ‘गोकुळ’ बाबत काहीही बोलले नाहीत. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीतील दारुण पराभवानंतरच त्यांना हा साक्षात्कार झालेला दिसतो. त्यातूनच ते माझ्यावर आरोप करीत आहेत. गेल्या ३५-४० वर्षाच्या राजकीय आणि सामाजिक जीवनाच्या वाटचालीमध्ये माझ्या वैयक्तिक प्रतिमेला फार जपत आलो आहे. मी कुठलीही गोष्ट मान्य करीन परंतु माझी प्रतिमा, माझा स्वाभिमान, माझ्याबद्दलचा समाजाचा दृष्टिकोन कधीही बदलता कामा नये, यासाठी मी पडेल ती किंमत देऊन कायदेशीर लढाई लढत असतो. आजपर्यंत ज्या-ज्या वेळी माझी व्यक्तिश: बदनामी केली, त्यांच्याविरोधात मी १०० कोटी रुपयांचे फौजदारी बदनामीकारक दावे न्यायालयात दाखल केलेले आहेत. माझ्या वतीने दाखल होत असलेला हा दहावा दावा आहे.
हे वक्तव्य म्हणजे साखर कारखानदारांचा अपमान
जिल्हा बँकेतून साखर कारखान्यांसह इतर संस्थांना अर्थपुरवठा होतो म्हणून माझ्याविरोधात जाण्यास आमदार घाबरतात, असे आमदार पाटील म्हणतात. हे त्यांचे वक्तव्य म्हणजे आमदारांसह बँकेच्या संचालकांचा व कारखानदारांचा अपमान असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी म्हटले आहे.
हे करून दाखवाच…!
आमदार पाटील हे गोकुळ दूध संघ आणि के. डी. सी. सी बँकेत चौकशी लावतो, हे करतो आणि ते करतो, असा नुसत्या बाष्कळ गप्पा मारत आहेत. त्यांनी ते एकदा करूनच दाखवावेच. कारण, आम्ही संस्था कशा स्वच्छ, पारदर्शी आणि सभासदाभिमुख चालविलेल्या आहेत, हे सगळ्या सभासदाना आणि जनतेलाही माहीत असल्याचे मुश्रीफ यांनी पत्रकात म्हटले आहे.

काळजाचा ठोका चुकला..! एकनाथ शिंदेंचं हेलिकॉप्टर वादळात अडकलं, मुंबईत इमर्जन्सी लँडिंग…..
तामिळनाडूत राजकीय बॉम्ब, भाजपला रोखण्यासाठी DMKचा मोठा जुगार; विजय यांना CM करणार,सरकारला बाहेरून पाठिंबा….
ममता बॅनर्जींचे संपूर्ण मंत्रिमंडळ बरखास्त, मुख्यमंत्रीपदही गेलं; बंगालमध्ये अभूतपूर्व राजकीय भूकंप, राज्यपालांनी TMCची सत्ता उलथवली….
कलिंगडला अखेर क्लिन चिट, मुंबईतील चौघांचा मृत्यू उंदीर मारण्याच्या औषधामुळे, फॉरेन्सिक रिपोर्ट समोर….
तामिळनाडूतील सत्ता पेच वाढला, राज्यपालांविरोधात विजय घेणार सुप्रीम कोर्टात धाव..?
महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल उद्या दुपारी 1 वाजता जाहीर होणार, बोर्डाकडून मोठी घोषणा….