बारामतीच्या पोटनिवडणुकीबाबत काँग्रेसचा मोठा निर्णय..? रोहित पवार आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्या भेटीत काय घडलं..?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “बारामतीच्या पोटनिवडणुकीतून काँग्रेसने माघार घ्यावी, यासाठी आमदार रोहित पवार यांनी प्रयत्न सुरु केले आहेत. राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेतलीये.
नाना चौकातील सर्वोदय आश्रमात दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. दरम्यान, या भेटीनंतर रोहित पवार यांनी महाराष्ट्र टाईम्सशी बोलताना प्रतिक्रिया दिलीये. ते नेमकं काय म्हणाले? जाणून घेऊयात..
रोहित पवार म्हणाले, “बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, अशी सर्वांचीच इच्छा आहे. आमच्या पक्षाने सर्वात आधी हा निर्णय घेतला होता. इतर पक्षांनी देखील तो निर्णय घेतलेला आहे. इथं येऊन आम्ही सपकाळ साहेबांना विनंती केलेली आहे. मात्र, त्यांनी उमेदवार देत असताना महत्त्वाचा संदेश दिलेला आहे. एफआयआर आणि तपासाच्या बाबतीत अजितदादांना न्याय मिळायला हवा होता, तो या महाराष्ट्रामध्ये दिला जात नाही. हा संदेश फॉर्म भरुन काँग्रेसने दिलेला आहे. काही दिवसांपूर्वी पार्थ पवारांनी जे स्टेटमेंट दिलं. त्यामध्ये नक्कीच काँग्रेसमध्ये नाराजी आहे. पार्थचं ते स्टेटमेंट चुकीचंच होतं. मात्र, तरीसुद्धा मी पार्थच्या वतीने त्यांची दिलगिरी व्यक्त केली. मला वाटतं, काँग्रेसच्या वतीने त्याठिकाणी योग्य तो निर्णय घेतला जाईल. ते सुद्धा वरिष्ठांशी बोलतील. फॉर्म मागे घेण्याची तारखेआधी काँग्रेसकडून योग्य असा निर्णय घेतला जाईल. काँग्रेस पक्ष वेगळा त्यांची कामाची पद्धत आणि धोरणं वेगळी आहेत. त्यांची वेगळी प्रोसेस असते. त्यापद्धतीने ते जातील.”, असंही रोहित पवार यांनी नमूद केलं.
काँग्रेसकडून आकाश मोरे यांना उमेदवारी; अजितदादांच्या मृत्यूच्या तपासाचा मुद्दा ऐरणीवर
बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने आपली रणनीती स्पष्ट करत अॅड. आकाश मोरे यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवलंय. एकीकडे सर्व पक्षांनी सूनेत्रा पवारांविरोधात उमेदवार देणे टाळल्याचं पाहायला मिळतंय. मात्र, काँग्रेसने अजित पवारांच्या अपघाताबाबतच्या तपासाचा मुद्दा उपस्थित करत उमेदवार दिलाय. आकाश मोरे व्यवसायाने वकील असलेल्या मोरे यांनी बी.ए. एल.एल.बी. पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले असून, गेल्या दोन-अडीच दशकांपासून ते सामाजिक कार्यात हिरीरीने ओढले गेले आहेत. आपल्या वडिलांचा जनसेवेचा वारसा समर्थपणे पेलणारे मोरे आता थेट राजकीय निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
या निवडणुकीत आकाश मोरे यांनी अतिशय गंभीर आणि संवेदनशील प्रश्नाकडे जनतेचे लक्ष वेधले आहे. अजित पवार यांचा विमान अपघात हा निव्वळ अपघात नसून तो संशयास्पद असल्याचा दावा त्यांनी केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी होणे गरजेचे असतानाही, विद्यमान सरकार या तपासाबाबत उदासीन असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. शिवाय, सरकारने अजितदादांच्या अपघाताबाबत एफआयआर नोंदवून घेतल्यास माघार घेऊ, असंही मोरे यांनी स्पष्ट केलं होतं.

हाजी रफीक अहेमद लोहार नगर परिषद उर्दू उच्च प्राथमिक शाळा क्रं २ पुसद येथे सामाजिक अंकेक्षण निरीक्षण ; ग्राम व जिल्हा साधन व्यक्तींची भेट….
माळपठार भागातील रस्त्याकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाला पुसद काँग्रेसचे “अल्टीमेटम”
बारामतीमधून काँग्रेसची माघार, विजय वडेट्टीवार यांनी स्पष्टच सांगितले, ‘आमच्या वरिष्ठांशी…’
अवकाळीबाधीत शेतकऱ्यांना सरकारचा मोठा दिलासा ; आर्थिक मदत केली जाहीर….
बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेसची माघार ; हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा, फडणवीसांचा तो शब्दही सांगितला..!
भारतीय राजकारणात मोठा बदल! संसद आणि विधानसभांमध्ये महिलांना ३३% आरक्षण लागू होणार..? विधेयकाला मोदी कॅबिनेटची मंजुरी….
बारामतीच्या पोटनिवडणुकीबाबत काँग्रेसचा मोठा निर्णय..? रोहित पवार आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्या भेटीत काय घडलं..?