एमएचटी सीईटी नोंदणीला २४ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुणे :- “राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे २०२६-२७ या शैक्षणिक वर्षातील अभियांत्रिकी व तंत्रज्ञान, औषधनिर्माणशास्त्र, बी. प्लॅनिंग, एम. प्लॅनिंग ( इंटिग्रेटेड) आणि कृषी या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या ‘एमएचटी सीईटी’ (पीसीएम/पीसीबी) अभ्यासक्रमाच्या सीईटी प्रवेश नोंदणीला २४ फेब्रुवारीपर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे.
त्याचबरोबर, एमबीए आणि एमएमएस अभ्यासक्रमाच्या सीईटीसाठी २५ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे.
यंदापासून ‘एमएचटी सीईटी’ (पीसीएम/पीसीबी), एमबीए आणि एमएमएस या तीन अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा दोनदा होणार आहे. या तिन्ही सीईटी परीक्षेसाठी पहिल्या संधीसाठी आठ लाख ३१ हजार २७७ विद्यार्थ्याची नोंदणी केली आहे. तर दुसऱ्या संधीसाठी चार लाख २० हजार ५१५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. दोन्ही संधी मिळून एकूण १२ लाख ५१ हजार ७९२ विद्यार्थी प्रवेश परीक्षा देणार आहेत. विद्यार्थ्यांना एक प्रवेश परीक्षा देणे बंधनकारक असून दुसरी प्रवेश परीक्षा ऐच्छिक असेल. यासाठी विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज करताना आताच दोन प्रवेश परीक्षा द्यायच्या आहेत की एक प्रवेश परीक्षा द्यायची हे ठरविण्यास सांगण्यात आले होते. विद्यार्थ्याने दोन प्रवेश परीक्षा दिल्यास, त्याला दोन्हीपैकी ज्या परीक्षेत जास्त गुण असतील ते प्रवेशासाठी गृहीत धरले जातील, असे सीईटी कक्षाने स्पष्ट केले आहे.
दोन्ही सत्रातील परीक्षेच्या तारखा
अभ्यासक्रम : पहिली परीक्षा : दुसरी परीक्षा
एमएचटी सीईटी (पीसीएम) : ११ ते १९ एप्रिल : १४ ते १७ मे
एमएचटी सीईटी (पीसीबी) : २१ ते २६ एप्रिल : १० ते ११ मे
एमबीए/ एमएमएस : ६ ते ८ एप्रिल : : ९ मे
सीईटी परीक्षेसाठी गेल्या काही वर्षांमध्ये नोंदणी केलेले विद्यार्थी
प्रवेश परीक्षा : २०२३-२४ : २०२४-२५ : २०२५-२६
एमएचटी सीईटी (पीसीएम) : ३,१३,७३१ : ३,७९,७९४ : ४,६४,२६३
एमएचटी सीईटी (पीसीबी) : २,७७,४०१ : २,९५,५७७ : ३,०१,०७२
एमबीए / एमएमएस : १,३०,९२७ : १,५२,९११ : १,५७,२८१

गोवंश तस्करांनी केली बजरंग दल कार्यकर्त्याची दगडांनी ठेचून निर्घृण हत्या ; सुकळी गावात मध्यरात्री घडला काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार…
लडाखमध्ये लष्कराचे ‘चीता’ हेलिकॉप्टर डोंगराला धडकले, मेजर जनरल थोडक्यात बचावले; दोन्ही पायलट जखमी….
कॉकरोच जनता पार्टीवर कारवाई; एक्स, इन्स्टानंतर वेबसाईटवरही बंदी…
पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ, चेक करा नवे दर…
दहावी पास विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, बोर्डाने घेतला मोठा निर्णय…
उद्धव ठाकरेंनी फसवलं..? बच्चू कडू यांचा खळबळजनक गौप्यस्फोट…