‘महात्मा गांधींच्या हत्येमागे RSS’, विधानामुळे राहुल गांधी भिवंडीत; कोर्टात नेमकं काय घडलं?

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
भिवंडी :- “लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी भिवंडीत झाले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मानहानीप्रकरणी भिवंडी न्यायालयातील सुनावणीला लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी उपस्थित राहिले.
2014च्या सार्वत्रिक निवडणूक काळात भिवंडी तालुक्यातील सोनाळेमध्ये राहुल गांधींची प्रचार सभा होती. त्यावेळी भाषणात राहुल गांधी यांनी महात्मा गांधींच्या हत्येमागे RSSचा हात असल्याचं विधान केलं होतं. काय नेमकं प्रकरण? सविस्तर जाणून घेऊया.
राहुल गांधी यांच्या विधानाविरोधात RSSचे पदाधिकारी राजेश कुंटे यांनी भिवंडी न्यायालयात याचिका दाखल केली होती. या प्रकरणात राहुल गांधी यांनी दिलेले जामीनदार माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचं निधन झालंय. त्यामुळे न्यायालयात नवीन जामीनदार सादर करण्यात आला. याकरता राहुल गांधी आज न्यायालयात हजर होते.
आरएसएस मानहानी प्रकरणाची सुनावणी संपली असून राहुल गांधी भिवंडी कोर्टातून निघाले. हर्षवर्धन सपकाळ राहुल गांधींचे नवे जामीनदार असणार आहेत. राहुल गांधींच्या वकिलांनी जामीनपत्र दाखल केलं. महात्मा गांधींच्या हत्येमागे RSS हात असल्याचं विधान राहुल गांधींनी केलं होतं. ठाण्यात राहुल गांधींविरोधात आंदोलन पाहायला मिळालं. राहुल गांधींच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवण्यात आले. ठाण्यात भाजप युवा मोर्चा राहुल गांधी आक्रमक दिसला.
‘राजकीय द्वेषातून खटला’, राहुल गांधी यांचा न्यायालयात दावा
लोकसभेतील विरोधी पक्षनेते Rahul Gandhi यांनी 2018 मधील मानहानी प्रकरण हे “राजकीय द्वेषातून” दाखल करण्यात आले असून, आपली आणि काँग्रेसची प्रतिमा मलिन करण्याचा हेतू असल्याचा दावा केला. उत्तर प्रदेशातील सुलतानपूर येथील विशेष न्यायालयात विशेष न्यायाधीश शुभम वर्मा यांच्यासमोर गांधी हजर झाले.हे प्रकरण २०१८ मधील कर्नाटक विधानसभा निवडणुकीदरम्यान घेतलेल्या पत्रकार परिषदेत केंद्रीय गृहमंत्री Amit Shah यांच्याविरोधात कथित आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या आरोपांशी संबंधित आहे. त्या वेळी शाह हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. गांधी यांनी न्यायालयात सर्व आरोप फेटाळून लावले. “मी कोणाविरुद्धही आक्षेपार्ह भाषा वापरलेली नाही. माझ्या विधानाचा विपर्यास करून खोटी तक्रार दाखल करण्यात आली आहे,” असे त्यांच्या वकिलांनी सांगितले.”माझी आणि माझ्या पक्षाची प्रतिमा खराब करण्याच्या उद्देशाने राजकीय द्वेषातून माझ्याविरुद्ध आरोप करण्यात आले आहेत,” असे गांधी यांनी न्यायालयाला सांगितल्याचे त्यांच्या वकिलांनी स्पष्ट केले.

गोवंश तस्करांनी केली बजरंग दल कार्यकर्त्याची दगडांनी ठेचून निर्घृण हत्या ; सुकळी गावात मध्यरात्री घडला काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार…
लडाखमध्ये लष्कराचे ‘चीता’ हेलिकॉप्टर डोंगराला धडकले, मेजर जनरल थोडक्यात बचावले; दोन्ही पायलट जखमी….
कॉकरोच जनता पार्टीवर कारवाई; एक्स, इन्स्टानंतर वेबसाईटवरही बंदी…
पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ, चेक करा नवे दर…
दहावी पास विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, बोर्डाने घेतला मोठा निर्णय…
उद्धव ठाकरेंनी फसवलं..? बच्चू कडू यांचा खळबळजनक गौप्यस्फोट…