प्रसिद्ध साहित्यिक शंकर यांचे निधन,बंगाली साहित्याला नवे पैलू पाडणारा लेखक कालवश….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
कोलकाता :- “बंगालच्या सामान्य शहरी जीवनातून कालातीत कथांची निर्मिती करणारे लेखक मणिशंकर मुखर्जी यांचे वृद्धापकाळाशी निगडीत आजारपणामुळे निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते. त्यांच्यावर कोलकात्यामधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते, तिथेच शुक्रवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
त्यांच्या पश्चात दोन कन्या आहेत. शंकर यांना साहित्य अकादमी पुरस्काराने गौरवण्यात आले होते.
मणिशंकर मुखर्जी हे ‘शंकर’ या टोपणनावाने साहित्य वर्तुळ आणि रसिकांमध्ये ओळखले जात. त्यांच्या कथांचा प्रभाव पडलेल्या दिग्गजांमध्ये थोर दिग्दर्शक सत्यजित रे यांचाही समावेश होता. शंकर यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शोक व्यक्त करून त्यांना श्रद्धांजली वाहिली. बंगाली भाषेला नवा आयाम देणाऱ्या, कलकत्तापासून ते कोलकात्यापर्यंत आणि त्यानंतरही या शहराचे बदलत्या स्वरूपाची दखल घेणारा सक्षम लेखक म्हणून शंकर नावाजले गेले. शहरी जीवनातील आकांक्षा, चिंता, गुंतागुंती आणि नैतिक दुविधा दर्शवणारे विपुल लिखाण त्यांनी केले.
शंकर यांचा जन्म ७ डिसेंबर १९३३ रोजी, सध्या बांगलादेशात असलेल्या जेस्सोर जिल्ह्यात झाला. त्यांचे वडील वकील होते. दुसऱ्या जागतिक महायुद्धापूर्वी मुखर्जी कुटुंब कलकत्त्याला स्थलांतरित झाले. त्यानंतर हावडा येथेच शंकर यांची जडणघडण झाली. पूर्णवेळ लेखनाला वाहून घेण्यापूर्वी त्यांनी कलकत्ता उच्च न्यायालयातील अखेरचे इंग्रज बॅरिस्टर नोएल बारवेल यांच्याकडे कारकून म्हणून काम केले. बारवेल यांच्या निधनानंतर त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी त्यांनी लेखणी हातात घेतली आणि ‘कतो अजानारे’चे (किती अज्ञात) लेखन केले. यामुळे त्यांच्या लेखनाची सुरुवात झाली आणि ‘चौरंगी’मुळे त्यांचे नाव घराघरात पोहोचले. सत्यजित रे यांनी त्यावर आधारित त्याच नावाने चित्रपटही केला. रे यांच्या गाजलेल्या ‘कलकत्ता त्रयीं’पैकी दोन चित्रपट ‘सीमाबद्ध’ आणि ‘जन अरण्य’ या शंकर यांच्या पुस्तकांवर आधारित होते.

गोवंश तस्करांनी केली बजरंग दल कार्यकर्त्याची दगडांनी ठेचून निर्घृण हत्या ; सुकळी गावात मध्यरात्री घडला काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार…
लडाखमध्ये लष्कराचे ‘चीता’ हेलिकॉप्टर डोंगराला धडकले, मेजर जनरल थोडक्यात बचावले; दोन्ही पायलट जखमी….
कॉकरोच जनता पार्टीवर कारवाई; एक्स, इन्स्टानंतर वेबसाईटवरही बंदी…
पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ, चेक करा नवे दर…
दहावी पास विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, बोर्डाने घेतला मोठा निर्णय…
उद्धव ठाकरेंनी फसवलं..? बच्चू कडू यांचा खळबळजनक गौप्यस्फोट…