“राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या युतीवर शिक्कामोर्तब झालं याचा मला आनंद, मी..”; सुप्रिया सुळेंचं वक्तव्य काय..?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल नुकताच जाहीर झाला. या निवडणुकीत राज्यात महायुतीला मोठं यश मिळालं. या निवडणुकीनंतर आता राज्यातील महापालिकांची निवडणूक जाहीर झालेली आहे.
या महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी पाहायला मिळत आहेत. गेल्या काही दिवसांपासून शिवसेना (ठाकरे) आणि मनसेच्या युतीच्या चर्चा सुरू होत्या. त्यानंतर अखेर आज (२४ डिसेंबर ) उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत शिवसेना (ठाकरे) आणि मनसेच्या युतीची अधिकृत घोषणा केली. दरम्यान खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आलेत. त्यांच्या युतीवर शिक्कामोर्तब झालं आहे याचा मला आनंद आहे. मी त्यांचं अभिनंदन करते असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. दरम्यान दोन्ही पवार कधी एकत्र येणार? असं विचारलं असता सुप्रिया सुळे म्हणाल्या माझ्याकडे आघाडी संदर्भात कुठलाही प्रस्ताव अजून आलेला नाही. शरद पवार आणि अजित पवार काय चर्चा करतात यामध्ये मी लक्ष घालत नाही. माझ्यासाठी आणि आमच्या सगळ्यांसाी शरद पवार सांगतील ती पूर्व दिशा आहे असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
प्रशांत जगताप यांचा राजीनामा झालाय का?
प्रशांत जगताप यांचा राजीनामा झालाय का? हे विचारलं असता सुप्रिया सुळे म्हणाल्या की तुम्ही त्यांना इथे बसवा, समोरासमोर बसवा तुम्ही वेळ सांगा, प्रश्न ठरवा आणि आम्हाला समोरासमोर बसवा. आमच्यात कुठलेही वाद नाहीत असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय. माझ्यात आणि प्रशांत जगताप यांच्यात कुठलेही वाद नाहीत हे तुम्हाला मी पुन्हा पुन्हा सांगते आहे असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या. तसंच जागावाटपाची चर्चा ही काँग्रेस, शिवसेना यांच्यासह सुरु आहे. संजय राऊत यांच्याशी माझी रोज चर्चा सुरु आहे. पुणे, मुंबई, नाशिक या महापालिकांसाठी माझी चर्चा सुरु आहे. जयंत पाटील सांगलीला गेले आहेत. सतेज पाटील यांच्याशी जयंत पाटील यांनी चर्चा केली आहे. त्यामुळे या चर्चा सुरु आहेत असंही सुप्रिया सुळेंनी सांगितलं.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….