महागाव बाजार समितीच्या सभापती विरोधात आणलेल्या ठरावावर 26 डिसेंबर ला होणार मतदान….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
महागाव :- “महागाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या राजकारणात मोठ्या घडामोडी होताना दिसत आहेत. सभापती गुलाब लोभा जाधव यांच्या कार्यपद्धतीवर नाराज होऊन बहुसंख्य संचालकांनी त्यांच्याविरुद्ध बंड पुकारत अविश्वास प्रस्ताव जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्याकडे दाखल केला आहे.
त्यानुसार जिल्हाधिकारी यवमाळ विकास मीना (भाप्रसे) यांनी आदेश करत महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी विक्री( नियमन) अधिनियम 1963 कलम 23(अ)3 नुसार कृषी उत्पन्न बाजार समिती महागाव ची विशेष सभा श्री सखाराम मुळे, उपविभागीय अधिकारी उमरखेड यांचे अध्यक्षतेखाली दिनांक 26. 12. 2025 रोज सकाळी अकरा वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती महागावच्या सभागृहात कृषी उत्पन्न बाजार समिती महागाव चे विद्यमान सभापती गुलाब लोभा जाधव यांच्याविरुद्ध दाखल झालेल्या अविश्वास प्रस्ताव चर्चा करून मतदान करण्यासाठी होणार आहे.
या अविश्वास प्रस्तावावर स्वाक्षरी करणाऱ्या संचालकांनी सभापती जाधव यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ‘सभापती हे संचालक मंडळाला विश्वासात न घेता मनमानी पद्धतीने निर्णय घेतात. संस्थेचे आर्थिक हित जोपासत नाहीत. असा ठपका प्रस्तावात ठेवण्यात आला आहे. तसेच, कोणत्याही आदेशासाठी संचालक मंडळाची मान्यता घेणे आवश्यक असताना, मासिक सभेत विषय न ठेवता परस्पर आदेश काढले जात आहेत. इतकेच नव्हे, तर मासिक सभेत बहुमताने मंजूर झालेल्या ठरावांचीही अंमलबजावणी सभापतींकडून केली जात नसल्याचा आरोप संचालकांनी
केला आहे.
या अविश्वास प्रस्तावावर रामेश्वर करपे, गजेंद्र देशमुख, विनोद पाटील राऊत, किशोर देशमुख, वासुदेव नेवारे, कृष्णराव राऊत, निरंजन धनगर, रवी पवार, उकंडा राठोड, पुंडलिक भुरके, परमेश्वर जाधव, विजय कृष्णापुरे, रितेश पुरोहित आणि विनोद भगत अशा १४ संचालकांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. एकाच वेळी एवढ्या मोठ्या संख्येने संचालकांनी अविश्वास दाखवल्याने सभापतींचे पद धोक्यात आले आहे. महागाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विद्यमान सभापती वर अविश्वास आल्याने महागावच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….