निकालानंतर महायुती तुटणार? रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यावर बावनकुळेंनी सांगितले, “स्थानिक परिस्थिती कशी राहील.”
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “मला २ तारखेपर्यंत युती टिकवायची आहे, असे वक्तव्य करून भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी महायुतीत काहीच आलबेल नसल्याचे सूतोवाच केले होते. त्यांनी या वक्तव्यानंतर कोणतेही स्पष्टीकरण दिले नाही.
तर भाजपच्या नेत्यांनी त्यांचे वक्तव्य त्या अर्थाने नव्हते अशी सारवासारव केली. महायुतीत पक्ष वाढीवरून वाद उफळल्याचे दिसून येत आहे.
नगरपालिका, नगरपरिषद निवडणुकीतच या दोन्ही पक्षातील वरिष्ठ एकमेकांवर नाराज असल्याचे दिसून येत आहे. अशातच महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डोंबिवलीत सुरू असलेले फोडाफोडीचे राजकारण काही थांबण्याचे चिन्हे नाहीत. ३ नोव्हेंबरला शिवसेना शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला. ठाणे जिल्ह्यातील फोडाफोडीवरून शिंदे नाराज असल्याची चर्चा असतानाच शिंदेंच्या निकटवर्तींयांनाच भाजपात घेतल्याने महायुतीमधील तणाव वाढण्याची शक्यता आहे. या सर्व प्रकरणात भाजप नेते आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. ते प्रसार माध्यमांसोबत बोलत होते.
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत काय बोलतायेत हे संपूर्ण महाराष्ट्राने ऐकले आहे. रवींद्र चव्हाणांच्या या वक्तव्याने महाराष्ट्रात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. रवींद्र चव्हाण नेमक्या काय अर्थाने बोलले हे तेच सांगू शकतील पण निवडणूक प्रचारात महायुतीच्या मित्र पक्षांनी एकमेकांवर टीकेचा भडीमार सुरु केला आहे. ठिकठिकाणी मित्रपक्ष एकमेकांची उणीदुणी काढताना दिसत आहेत. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री आणि नेते भाजपवर टीकेचे बाण सोडत आहेत. त्या पार्श्वभूमीवर रवींद्र चव्हाण यांनी केलेले वक्तव्य हे भाजपने मित्र पक्षांना दिलेला इशारा तर नाही ना अशी चर्चा सुरु झाली आहे.
काय म्हणाले बावनकुळे?
राज्य निवडणूक आयोगाला निवडणुकीचा घोळ सुरू आहे. यासाठी आयोगाला चार पत्र पाठवलेले आहे. नाना पटोले यांना प्रत्येक गोष्टीत राजकारण करायचे ती बाब वेगळी आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या भूमिके विरोधात आम्ही पत्र देऊन आमची भूमिका मांडली आहे. या अनुषंगाने पुढे काय करता येईल ते बघू निवडणुका पुढे ढकलायला जाणे चूक आहे. कामठीमध्ये बनावट मतदान झाल्याचा आरोप होत आहे. यावर बावनकुळे म्हणाले की, प्रत्येकाचा तो अधिकार आहे. आमची त्यामध्ये काही हरकत नाही. काही गैरप्रकार झाला असेल तर न्यायालय त्यामध्ये निर्णय देईल. रविंद्र चव्हाण यांच्या वक्तव्यावर बावनकुळे म्हणाले की, स्थानिक निवडणुकीचा तो विषय होता. स्थानिक परिस्थिती कशी राहील यासंदर्भात दोन तारखेला निर्णय घेऊ असे चव्हाण म्हणाले. त्यांचा संदर्भ काय होता हे विचार न करता भ्रम पसरवीला जात आहे, असेही बावनकुळे म्हणाले…

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….