हिवऱ्याच्या साहेबरावांचे पक्ष बदलीचे वर्तुळ पूर्ण ; स्वार्थापोटी सर्वकाही माझ्याकडे कार्यकर्त्यांचे काय..?
रितेश पुरोहित
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
महागाव :- पक्ष बदलीत तरबेज असलेल्या साहेबरावांचे पक्ष बदलीचे वर्तुळ पूर्ण झाले आहे सुरुवातीला शिवसेना, स्नेहराज मित्र संघटना, काँग्रेस, समाजवादी पार्टी, राष्ट्रवादी, नंतरच्या काळात शरद पवार राष्ट्रवादी आणि आता त्यानंतर भाजपा हे सर्व असताना कार्यकर्त्यांचा बळी घेऊन नियमित मी आणि मीच राजकारणात कोणत्याही पदावर गेलो पाहिजे ही अपेक्षा ठेवून राजकारणाची वाटचाल सुरू असणाऱ्या साहेब रावांना यावेळेस हिवरा जिल्हा परिषद ची निवडणूक आपल्या अर्धांगिनी साठी फार मोठी अवघड जाणार आहे मागील काळात जिल्हा परिषद हिवरा ही अनुसूचित जातीसाठी आरक्षित असताना पुरुषा ऐवजी आपल्या वैयक्तिक हितचिंतकासाठी तालुक्यातील व जिल्ह्याबाहेरील महिलेला राष्ट्रवादीकडून तिकीट घेऊन निवडणूक रिंगणात उतरविले होते त्यावेळेस जनतेने याच हिवर्याच्या साहेबरावांना जनतेने सपशेल नाकारले त्या ठिकाणी भाजपाचे विलास भुसारे जिल्हा परिषद सदस्य झाले परंतु राजकीय व वैयक्तिक स्वार्थापोटी घेतलेला निर्णय त्यांच्या अंगलट आला या जिल्हा परिषदेमुळे हिवरेच्या साहेब रावांची ग्रामपंचायत सुद्धा त्यांच्या हातून गेली काल-परवाच्या पोरांनी साहेबरावांना ग्रामपंचायत मध्ये पानिपत केले त्यानंतर याच साहेब रावांनी जिल्हा बँक लडवली त्या जिल्हा बँकेत काय दिवे लावले हे या तालुक्यातील शेतकऱ्यांनी बघितले आहे खरे तर हाव असावी ते कित पर्यंत असे असताना हल्ली हिवरा जिल्हा परिषद सर्कल महिलेसाठी राखीव सर्वसाधारण पदासाठी सुटलेली असताना आपल्या एखाद्या कार्यकर्त्याला निवडणुकीमध्ये उतरवून त्याच्या पाठीमागे राहणे हे कर्म प्राप्त होते परंतु साहेबराव सध्या सर्वच पदे माझ्याकडे कसे राहतील या दृष्टिकोनातून आपल्या अर्धांगिनीला जिल्हा परिषदेमध्ये उतरविण्याची तयारी केली आहे पक्ष कोणता तर भाजपा या साहेबरावने मागील झालेल्या विधानसभेमध्ये भाजपाचा विरोध करून काँग्रेसचे उमेदवार साहेबराव कांबळे यांना निवडून आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात पॅकेज घेतल्याचे बोलल्या जाते परंतु निवडणुकीच्या सहा महिन्यानंतर ज्यांच्या सोबत विधानसभेमध्ये विरोध केला त्यांच्यासोबत हात मिळवणी करून भाजपामध्ये पक्ष प्रवेश केला असे असले तरी हा पक्षप्रवेश कशासाठी हा पक्षप्रवेश केवळ जिल्हा बँक जिल्हा परिषद आपल्या पदरात कशी पडेल या दृष्टिकोनातून साहेबराव यांनी लावलेली फिल्डिंग आहे सध्या मीतीस ते अडगळीत पडलेली आहे.
असे जरी काही असले तरी यावेळेस मात्र जनता जागृत झालेली आहे त्यांना त्यांच्या भरोशावर ही निवडणूक ते निवडणूक लढवतील व निवडूनही येथील असे कुठेही चित्र दिसत नाही खरे तर जिल्हा परिषद ही निवडणूक त्यांच्यासाठी महत्वाची नाही परंतु सत्तेची हवस ही फार मोठी लालच आहे त्यांना प्रलोभन देत आहे मागील झालेल्या जिल्हा बँक निवडणुकीमध्ये त्यांनी त्यांचे कट्टर विरोधक असलेल्यांना आपल्याकडे वळवून मनोमिलन केले होते परंतु आज मीतीस हे मनोमिलन कुठेही बघावयास मिळत नाही कारण त्यांच्या राजकीय जीवनात त्यांना अनेक वेळेस स्पीड ब्रेकर लागले तेच स्पीडब्रेकर त्यांना जिल्हा परिषदेपर्यंत पोहोचू न देण्यासाठी आत्तापासूनच फिल्डिंग लावीत आहे खरे तर यावेळेस त्यांनी त्यांच्या अति जवळच्या कार्यकर्त्याला या निवडणुकीमध्ये उतरविले तर काहीतरी बरे झाले असते परंतु असे न करता स्वहितासाठी सर्वकाही मलाच या अपेक्षेने या जिल्हा परिषद मध्ये उडी घेण्याचे ठरविले असल्याचे बोलल्या जाते परंतु त्यांनी आजपर्यंत त्यांच्या परिवारातील कुणी निवडणूक लढविणार आहेत असे स्पष्ट मत वैयक्तिक कार्यकर्त्याऐवजी मीडियासमोर सादर केलेले नाही त्यामुळे त्यांच्या पक्ष बदलीच्या वर्तुळावर फार मोठी चर्चा तालुक्यामध्ये घडत आहे असे असले तरी गावातील काही विरोधकांसोबत हात मिळवणी करून ग्रामपंचायत तुमच्या ताब्या मध्ये असू द्या मला किंवा माझ्या परिवारातील व्यक्तीला जिल्हा परिषदेवर जावयाचे आहे केवळ याकरिता विरोधकांसोबत हात मिळवणे केल्याचेअसे बोलल्या बोलल्या जाते तुर्तास इतकेच….

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….