राज्याच्या राजकारणात खळबळ, शिंदेंना एकटं सोडून शिवसेनेच्या सर्वच मंत्र्यांचा बैठकीवर बहिष्कार, पडद्यामागे मोठ्या हालचाली..!
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “राज्यात सध्या महायुतीचे सरकार आहे. या महायुतीत राष्ट्रवादी, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजपा असे तिन्ही पक्ष एकत्रितपणे सत्तेवर आहेत. परंतु गेल्या काही महिन्यांत एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे मंत्री वेगवेगळ्या कारणावरून नाराज झाल्याचे समोर आले आहे.
विशेषत: निधीवाटपाच्या मुद्द्यावरून शिंदे यांच्या मंत्र्यांनी उघडपणे आपली नाराजी बोलून दाखवलेली आहे. या निधीवाटपावरून शिंदे आणि भाजपाचे नेते एकमेकांसमोर आल्याचंही यापूर्वी पाहायला मिळालेलं आहे. असे असतानाच आता महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी घटना समोर आहे. मिळालेल्या माहितीनुसार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या सर्वच मंत्र्यांनी थेट बहिष्काराचं अस्त्र उगारलं आहे. शिंदेंच्या मंत्र्यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीवर थेट बहिष्कार घातला आहे.
मुंबईत नेमकं काय घडत आहे?
मिळालेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या मंत्र्यांमध्ये निधीवाटपावरून प्रचंड नाराजी आहे. आज (18 नोव्हेंबर) राज्य मंत्रिमंडळाची बैठक होती. या बैठकीला सामान्यत: सरकारमधील सर्वच मंत्री उपस्थित असतात. परंतु आजच्या बैठकीला शिंदेंचे सर्वच मंत्री अनुपस्थित होते. या बैठकीला शिवसेनेचे फक्त एकनाथ शिंदे हेच उपस्थित होते. सर्वच मंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. या भेटीत नेमकं कोणत्या मुद्द्यांवरून चर्चा झाली, हे अद्याप समोर आलेले नाही. मात्र शिवसेनेचा एकही मंत्री बैठकीला नसल्यामळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.
निधीवाटप की अन्य काही?
सूत्रांच्या माहितीनुसार निधीवाटपावरून शिंदेंच्या मंत्र्यांमध्ये नाराजी आहे. याबाबतच आपले मत मांडण्यासाठी त्यांनी फडणवीस यांची भेट घेतल्याचे बोलले जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. या निवडणुकीत स्थानिक पातळीवर शिवसेना पक्षाला मोठा फटका बसत आहे. शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. नुकतेच कल्याण डोंबीवलीच्या अनेक माजी नगरसेवकांनी भाजपात प्रवेश केला आहे. राज्यभरात भाजपात होत असलेल्या अशाच इन्कमिंगमुळे शिवसेनेत नाराजी असल्याचे बोलले जात आहे. यामुळेदेखील शिंदे यांचे मंत्री नाराज असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आगामी काळात नेमकं काय घडणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….