लाडक्या बहिणींसाठी आजपासून खात्यात जमा होणार ‘इतके’ पैसे….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “योजनेत ई-केवायसी प्रक्रिया १८ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
तांत्रिक अडचणी लक्षात घेऊन ई-केवायसी प्रक्रिया सुलभ करण्यात आली आहे.
१९ नोव्हेंबरपर्यंत ई-केवायसी करणे सर्व लाभार्थ्यांसाठी बंधनकारक आहे.
लाडकी बहिण योजनेसाठी ई केवायसी बंधनकारक करण्यात आल्याने यावेळचा हप्ता कधी मिळणार याकडे लाभार्थी महिलांचे लक्ष लागले होते, पण आता याची प्रतिक्षा संपली आहे. ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आजपासून ( ४ नोव्हेंबर) लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार आहे. याबाबत महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी ‘एक्स’वर माहिती दिली आहे.
आदिती तटकरे यांनी ‘एक्स’ पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : महिला सक्षमीकरणाची अखंड क्रांती!’ ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑक्टोबर महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस उद्या पासून सुरुवात होत आहे. लवकरच योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यात सन्मान निधी वितरित होणार आहे.
महाराष्ट्रातील माता-भगिनींच्या अखंड विश्वासाने सुरू असलेली सक्षमीकरणाची ही क्रांती यशस्वीरित्या मार्गक्रमण करत आहे. ही वाटचाल अशीच अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी मागील महिन्यापासून https://ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर E-KYC सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सर्व लाडक्या बहिणींनी 18 नोव्हेंबरचा आधी E-KYC प्रक्रिया पूर्ण करावी ही नम्र विनंती ! असे पोस्टमध्ये म्हटले आहे.
ई-केवायसीची मुदत कधीपर्यंत?
लाडकी बहिण योजनेसाठी ई-केवायसी बंधन करण्यात आली असल्याने महिलांची धाकधूक वाढली आहे.लाभाथी महिलांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याची तक्रारी दाखल झाल्या, याची महिला व बालकल्याण विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दखल घेतली आणि तांत्रिक अडचणी दूर करुन प्रक्रिया सुलभ केली. दरम्यान १९ नोव्हेंबर पर्यंत लाभार्थ्यांना ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
प्रश्न 1: लाडकी बहिण योजनेचा पुढचा हप्ता कधी जमा होणार?
?)
➡️ ४ नोव्हेंबरपासून ऑक्टोबर महिन्याचा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.
प्रश्न 2: सन्मान निधी कुठे जमा होईल?
➡️ लाभार्थ्यांच्या आधार-लिंक केलेल्या बँक खात्यात सन्मान निधी जमा केला जाईल.
प्रश्न 3: ई-केवायसी कधीपर्यंत करायची आहे?
➡️ ई-केवायसी करण्याची अंतिम तारीख १९ नोव्हेंबर आहे.
प्रश्न 4: ई-केवायसी प्रक्रिया कुठे करता येईल?
(
➡️ https://ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ई-केवायसी करता येईल.
प्रश्न 5: ई-केवायसी बंधनकारक का करण्यात आली आहे?
➡️ लाभार्थ्यांची ओळख निश्चित करून निधी थेट योग्य खात्यात पोहोचावा यासाठी.
प्रश्न 6: तांत्रिक अडचणींबाबत काही उपाय करण्यात आले आहेत का?
➡️ होय, मंत्री आदिती तटकरे यांनी अडचणी दूर करून प्रक्रिया अधिक सुलभ केली आहे.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….