वर्ल्डकप विजेत्या महाराष्ट्रातील महिला क्रिकेटपटूंना घसघशीत रोख इनाम, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये अनेक मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. आयसीसी वर्ल्ड कप जिंकलेल्या महिला भारतीय संघाबाबतही सरकारने रोख इनाम देण्याची घोषणा केली आहे.
भारतीय संघाच्या अभिनंदन प्रस्तावास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. त्यासोबतच संघातील महाराष्ट्राच्या खेळाडूंसह संपूर्ण संघाचा सत्कार करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. भारताने रविवारी दक्षिण आफ्रिका संघाचा फायनलमध्ये ५२ धावांनी पराभव केला होता. गेल्या अनेक वर्षांपासूनचा विजेतेपदाचा दुष्काळ महिला संघाने हरमनप्रीतच्या नेतृत्त्वाखाली संपवला. भारतीय संघामध्ये महाराष्ट्रातील तीन खेळाडूंचा समावेश होता.
महिला भारतीय संघामध्ये महाराष्ट्रातील सांगलीची कन्या स्मृती मंधाना, सेमी फायनलमध्ये शतक ठोकणारी जेमिमा रॉड्रीग्ज आणि स्पिनर राधा यादव यांचा समावेश आहे. तिघींचाही राज्य सरकारकडून सत्कार करण्यात येणार असून रोख पारितोषिकाने गौरवान्वित करण्याचा निर्णय मंत्रिमंडळात घेण्यात आला आहे. बैठकीनंतर देवेंद्र फडणवीसांनी जेव्हा मुंबईत सर्व संघ येईल त्यावेळी सर्व खेळाडूंचाही सत्कार करण्यात येईल असं म्हटलं आहे.
वर्ल्ड कपमध्ये स्मृती मंधाना ही भारतीय संघाची मुख्य ओपनर होती, ती वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक धावा करणारी दुसरी खेळाडू ठरली आहे. स्मृतीने ९ सामन्यांमध्ये ५४.२५ च्या सरासरीने ४३४ धावा केल्या. जेमिमाहने सेमी फायनल सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाविरूद्ध नाबाद शतकी खेळी करत संघाला विजय मिळवून दिला आहे.
बारामती येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी सहयोगी प्राध्यापकांची पाच पदे निर्माण करण्यास मान्यता. त्यासाठी आवश्यक खर्चाच्या तरतुदीस मंजुरी दिली गेलीय. तर वर्धा शहरातील रामनगर येथील भाडेपट्ट्याने दिलेल्या भूखंडधारकाला निवासी भूखंड कायमस्वरुपी मालकी हक्काने देण्यास मंजुरीचा निर्णय घेतला गेलाय.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….