‘मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील…!’, बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; ‘लोकल…’, म्हणत भाजपचाही पलटवार….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- “बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्ष कंबर कसून मैदानात उतरले आहेत. आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मुजफ्फरपूर येथून आपल्या प्रचाराला सुरुवात केली. यावेळी राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) नेते तेजस्वी यादव यांच्यासह एका संयुक्त रॅलीत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर थेट निशाणा साधला.
“जर आपण नरेंद्र मोदी यांना म्हणालात की, आम्ही आपल्याला मत देतो, आपण व्यासपीठावर येऊन नाचा, तर ते नाचतीलही,” असे राहुल गांधी म्हणाले.
पंतप्रधान मोदींवर निशाणा साधताना राहुल म्हणाले, मोदीजींना छठपूजा अथवा यमुना नदीच्या स्वच्छतेसंदर्भात काही देणेघेणे नाही, त्यांना केवळ तुमची मते हवी आहेत. यावेळी त्यांनी, दिल्लीतील प्रदूषित यमुना नदीमध्ये पूजा करणाऱ्या भाविकांची आणि पंतप्रधानांसाठी ‘खास तयार केरण्यात आलेल्या तलावातील त्यांच्या स्नाना’ची तुलना केली. एवढेच नाही तर, ‘मोदीजींनी त्यांच्या स्विमिंग पूलमध्ये आंघोळ केली, त्यांना छठपूजेशी काहीही देणेघेणे नाही,’ असेही ते म्हणाले.
भाजपचा पलटवार –
राहुल गांधींच्या या टीकेवर सत्ताधारी भाजपने पलटवार केला आहे. राहुल गांधी यांची भाषा ‘लोकल गुंडासारखी’ आहे. पंतप्रधान मोदींना मतदान करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा राहुल गांधींनी अपमान केला आहे. त्यांचे वक्तव्य भारतीय मतदार आणि लोकशाहीची थट्टा उडवणारे असल्याचे, भाजपने म्हटले आहे.
‘मत चोरीचा प्रयत्न होऊ शकतो’ –
यावेळी राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा आपला मतचोरीच जुना राग धरत आरोप केला. ते म्हणाले, त्यांनी महाराष्ट्र आणि हरियाणातील निवडणुका चोरल्या आणि आता बिहारमध्येही तसाच प्रयत्न करतील.” तसेच, बिहारमधील मतदार यादीतून सुमारे ६६ लाख नावे वगळल्याचा उल्लेख करत, त्यांनी लोकांना ‘महागठबंधन’ला मतदान करण्याचे आवाहन केले.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….