शरद पवारांच्या बैठकीला तीन आमदारांची दांडी….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत मुंबईत बैठक झाली. या बैठकीला सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या चारपैकी तीन आमदारांनी दांडी मारली.
माढ्याचे आमदार अभिजित पाटील हे एकमेव उपस्थित होते.
जिल्ह्यात असलेल्या चार आमदारांवर त्यांच्या तालुक्यासोबतच शेजारच्या एका तालुक्याची जबाबदारी आगामी निवडणुकीसाठी सोपविण्याचा निर्णय शरद पवार यांनी घेतला आहे. बैठकीला गैरहजर असलेल्या आमदारांवर आजच्या बैठकीत ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
या बैठकीला राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, सोलापूर जिल्ह्याचे प्रभारी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार एकनाथ खडसे, माजी मंत्री बाळासाहेब पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड, जिल्हाध्यक्ष वसंतनाना देशमुख, जिल्हा कार्याध्यक्ष रवी पाटील उपस्थित होते.
जिल्हाध्यक्ष देशमुख म्हणाले, आमदार उत्तम जानकर यांना एका प्रकरणात दिल्लीला जावे लागल्याने ते आजच्या बैठकीला गैरहजर होते. करमाळ्याचे आमदार नारायण पाटील व मोहोळचे आमदार राजू खरे यांनी बैठकीला हजर राहता येणार नसल्याबाबत अगोदरच पत्र दिले होते.
‘महाविकास’ म्हणून लढणार
आगामी निवडणुका सोलापूर जिल्ह्यात महाविकास आघाडी म्हणून लढणार असल्याचा निर्णय आजच्या बैठकीत झाल्याचे जिल्हाध्यक्ष देशमुख यांनी सांगितले. या शिवाय त्या-त्या तालुक्यातील स्थानिक आघाड्या जर सोबत आल्या तर त्यांनाही सोबत घेण्याचे आजच्या बैठकीत ठरले आहे. प्रदेशाध्यक्ष शिंदे व सोलापूर जिल्ह्याचे प्रभारी पाटील नोव्हेंबरमध्ये सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार असल्याचेही जिल्हाध्यक्ष देशमुख यांनी सांगितले.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….