मतदारयादीतील नाव आता ऑनलाइन शोधा…! ; या ‘वेबसाईट’वर जाऊन बघता येईल तुमचे नाव….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “नगरपरिषद, जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीच्या निवडणुकांचा मुहूर्त निघाला असून त्यानुसार शासन-प्रशासन कामाला लागले आहे. जिल्ह्यात फक्त नगरपरिषद व नगर पंचायतच्याच निवडणुका होत असून त्यानुसार प्रशासन व निवडणूक लढविणाऱ्या इच्छुकांकडून तयारी सुरू झाली आहे.
तर सर्वसामान्य नागरिक व नवमतदारांना मात्र मतदार यादीत आपले नाव आहे की नाही याची उत्सुकता लागून असते. अशांसाठी निवडणूक आयोगाने एक लिंक उपलब्ध करवून दिली असून त्याद्वारे आता घरबसल्या मतदार यादीतून आपले नाव शोधून घेता येणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाने १ जुलै २०२५ हा अधिसूचित दिनांक निश्चित केला असून त्या दिवशी अस्तित्वात असलेली विधानसभेची मतदार यादी राज्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपरिषद नगर पंचायतींच्या निवडणुकांसाठी वापरण्यात येत आहे. त्या आधारे तयार करण्यात आलेल्या जिल्हा परिषद निवडणूक विभाग व पंचायत समिती निर्वाचक गणनिहाय तसेच नगरपरिषद नगर पंचायतसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादीतील नाव शोधण्यासाठी स्वतंत्र संकेतस्थळाची लिंक राज्य निवडणूक आयोगाच्या https://mahasec.maharashtra.g ov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
विशेष म्हणजे, राज्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपरिषद -नगर पंचायतींच्या निवडणुकांसाठी प्रारूप मतदार यादी ८ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीतील नावे https://mahasecvoterlist.in/ या संकेतस्थळावर शोधण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
नवमतदारांत प्रथम मतदानाचा उत्साह
मतदानाला घेऊन पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावणाऱ्या नवमतादारांमध्ये जास्त उत्सुकता असते, कारण ही त्यांची पहिलीच वेळ असते. अशात या नवमतदारांमध्ये मतदानाला घेऊन जास्त उत्सुकता आहे. यामुळेच ते मतदार यादीत आपले नाव आले की नाही हे बघण्यासाठी उत्सुक आहेत. अशात आता त्यांना संकेतस्थळावर जाऊन आपले नाव शोधून घेता येणार आहे.
कार्यालयात उपलब्ध असणार मतदार यादी
जिल्ह्यात सध्या फक्त दोन नगरपरिषद व दोन नगर पंचायतच्या निवडणुका होत आहेत. यासाठी त्यांची प्रारूप मतदार यादीची छायांकित प्रत संबंधित नगर परिषद-नगर पंचायतच्या कार्यालयात उपलब्ध राहणार आहे. या मतदार यादी हवी असल्यास त्यासाठी प्रतिपृष्ठ दोन रूपये प्रमाणे शुल्क भरावे लागणार आहे.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….