शेतकऱ्याला महिन्याला 10 हजार पगार, संपूर्ण कर्जमाफी ते 70 हजार हेक्टरी भरपाई, जरांगेंच्या सरकारकडे 8 मोठ्या मागण्या….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांची बीडच्या नारायणगड येथे सभा पार पडली. दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा पार पडला. या मेळाव्याला मनोज जरांगे पाटील हे आजारी असूनही उपस्थित झाले.
यावेळी त्यांनी मराठा आरक्षणावर भाष्य केलंच, पण यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर देखील जास्त भाष्य केलं. राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकरी हवालदील झाला आहे. या भयानक परिस्थितीत शेतकऱ्यांना मदतीची आशा आहे. अशा काळात शेतकऱ्यांना काय-काय मदत करावी, याबाबत मनोज जरांगे पाटील यांनी विविध मागण्या केल्या आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी सरकारकडे 8 मोठ्या मागण्या केल्या आहेत.
मनोज जरांगे यांच्या 8 मागण्या, वाचा सविस्तर
पहिला मागणी – ओला दुष्काळ जाहीर करा
दुसरी मागणी – 70 हजार रुपये हेक्टरी द्यायचे
तिसरी मागणी – ज्यांची नदीच्या कडेची शेती वाहून गेली आहे त्यांना 1 लाख 30 हजार मदत द्यावी.
चौथी मागणी – संपूर्ण कर्जमुक्ती
पाचवी मागणी – ज्या शेतकऱ्याने विदर्भातील, मराठवाडा, खान्देश, पश्चिम महाराष्ट्र आणि उर्वरित महाराष्ट्रातील शेतकऱ्याने आत्महत्या केली तर शेतकऱ्याच्या कुटुंबाला शासकीय नोकरी सरकारने द्यावी.
सहावी मागणी – शेतकऱ्याला हमीभाव द्यायचा. त्याशिवाय आंदोलन थांबणार नाही.
सातवी मागणी – शेतीला नोकरीचा दर्जा द्या. जो 10 एकरचा आतला शेती करेल त्याला 10 हजार रुपये महिन्याला द्या. त्या पगारामुळे मुलं शेतात काम तरी करतील. शेती विकायची नाही.
आठवी मागणी – पिक विम्याला सरकारने तीन ट्रिगर बसवले आहेत. ते उठवायला पाहिजेत. पीकविमा द्यायचा.
“या मागण्या दिवाळीपर्यंत पूर्ण केल्या नाहीत तर आपण सर्व शेतकऱ्यांना धाराशिव किंवा बीड जिल्ह्याच्या सीमेवर बोलवू किंवा जालना, संभाजीनगर, जळगाव, बुलढाणामध्ये बैठकीला बोलवू. किती तारखेला आंदोलन सुरु करायची ते ठरवू. आधी बैठक घेऊ आणि नंतर आंदोलन सुरु करु. शेतकऱ्यांना न्याय देईपर्यंत मागे हटायचं नाही”, असं मनोज जरांगे पाटील म्हाले आहेत.