केवळ स्वातंत्र्य नको, हिंदवी स्वातंत्र्य हवे; नवरात्रौत्सवात दांडिया खेळून सणाचे वाटोळे केले – संभाजी भिडे….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
सांगली :- “जगात १८७ देश आहेत. यात आपण कुठे आहोत? संविधानावर पोटात मुरडा झाल्यासारखं विद्वान लोक बोलतात. काय संविधान?. पारतंत्र्यात खितपत पडलेल्या लोकांचा हा देश आहे. आम्हाला केवळ स्वातंत्र्य नको तर हिंदवी स्वातंत्र्य पाहिजे, असे प्रतिपादन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे यांनी बुधवारी सांगलीत केले.
गणेशोत्सव, नवरात्रमध्ये दांडिया खेळून सणाचे वाटोळे केले, असेही ते म्हणाले.
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने दुर्गामाता दौडीचे आयोजन करण्यात आले आहे. या दौडीमध्ये धारकऱ्यांना मार्गदर्शन करताना भिडे बोलत होते. ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज आपले आदर्श आहे. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने दुर्गामाता दौडीचे आयोजन करतो. ज्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी शपथ घेतली, तो दिवस विस्कटलेल्या नवरात्राला दुरुस्त करण्याचा प्रारंभ होता. गणपती उत्सव, नवरात्रमध्ये दांडिया खेळून वाटोळे केले.