हाजी रफीक अहेमद लोहार न.प उर्दू शाळा क्रं २ वृक्षारोपण उपक्रम….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- आज रोजी हाजी रफीक अहेमद लोहार नगरपरिषद उर्दू उच्च प्राथमिक शाळा क्रं २ लोहार लाईन पुसद येथे निशांत भाऊ बयास यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. या उपक्रमात स्थानिक नागरिक, विद्यार्थी व मित्रपरिवार उत्साहाने सहभागी झाले. कार्यक्रमांचे अध्यक्ष स्थानी श्री.निशांत बयास होते आलेल्या सर्व वार्डातील पाहुणे मंडळी कडून श्री.निशांत भाऊ बयास यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अब्दुल रब सर यांनी केले. त्यावेळीस शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष फारुक अहेमद तेली , विक्की गौरी , अन्वर लोहार, मतीन चव्हाण, एजाज टेलर, मुजम्मिल , इत्यादी उपस्थित होते
वाढदिवस साजरा करण्याचा हा आगळावेगळा उपक्रम पर्यावरण संवर्धनासाठी प्रेरणादायी ठरला. लावलेली झाडे हिरवाईचे व भविष्याचे प्रतीक म्हणून वाढदिवसाची आठवण कायम ठेवतील.आलेल्या सर्व पाहूणे कार्यक्रमाचे अध्यक्ष पालक वर्गाचे आभार मोहम्मद शारिक सर यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील मुख्याध्यापक मोहम्मद शारिक सर, स.शिक्षकआहे अब्दुल रब सर, वहिदा रेहमान बाजी, व मदतनीस मुस्कान सदफ या सर्वांचे कार्य होते
“एक झाड लावा, आयुष्यभर सावली द्या” या संदेशाने कार्यक्रमाचा समारोप झाला.