ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर दगडफेक….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
जालना :- “जालना येथे धनगर समाज बांधवांच्या आमरण उपोषण स्थळी भेट देण्यासाठी ॲड . गुणरत्न सदावर्ते हे मुंबईवरून समृद्धी महामार्गे जालना येथे आले असता यावेळी काकडे पेट्रोल पंपाजवळ त्यांच्या ताब्यावर मराठा आंदोलकांनी दगडफेक करत हल्ला केला आहे.
यामध्ये त्यांच्या गाडीचे नुकसान झाले असून सुदैवाने सदावर्ते यांना कुठलीही इजाजरी झाली नसली. यावेळी तात्काळ पोलिसांनी या आंदोलकांना ताब्यात घेत सदावर्ते हे जालन्याच्या दिशेने उपोषण स्थळी रवाना झाले आहे.
गेल्या काही दिवसांपासून गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेत मराठा आरक्षणाला विरोध केला होता. त्यामुळेच आज काकडे पेट्रोल पंपाजवळ मराठा आंदोलकांनी त्यांच्या गाडीवर दगडफेक केल्याची माहिती समोर आली आहे. सदावर्ते आज जालन्यात गेल्या पाच दिवसांपासून सुरु असणाऱ्या धनगर आंदोलनाला भेट देण्यासाठी जात होते. त्यामुळे त्यांच्या गाड्यांच्या ताफा रस्त्यावरुन जात असताना पोलिसांनी मोठा फौजफाटा ठेवला होता मात्र तरीही देखील काही मराठा आंदोलक सदावर्ते यांच्या गाडीवर धावून गेले आणि सदावर्ते यांच्या गाडीच्या काचेवर फटके मारले.
यानंतर पोलिसांनी सर्व मराठा आंदोलकांना ताब्यात घेतले आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे समर्थक असल्याची माहिती सध्या समोर आली आहे. त्यामुळे पोलीस आता या प्रकरणात काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

“जमीनचोर निघाला मुरलीधर”, मित्रपक्षांचा खासदार मोहोळांविरोधात शड्डू? धंगेकरांची सूचक पोस्ट….
निवडणूक आयोगावर राज ठाकरेंचा ‘बोगस’ बॉम्ब..! ‘मतदार यादीत ९६ लाख खोटे मतदार घुसवल्याचा आरोप….
बीडमधील ओबीसी मेळाव्यात छगन भुजबळ अन् धनंजय मुंडेंचं आक्रमक भाषण ; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया….
जीआरचा फुगा फुटतोय, मराठा समाजाचा उद्रेक पुन्हा होतोय..! विखे पाटलांना घेराव….
२४ वर्षांनी बाळा नांदगावकर शिवसेना भवनात, बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणींत अश्रू अनावर, म्हणाले; “लवकरच.”
९ नोव्हेंबरला शिवाजी पार्कवर बंजारा समाजाचा विशाल मोर्चा ; निरंजन नाईक होणार सहभागी….