एकनाथ शिंदेंचे सोशल मीडिया हॅक, खात्यावर पाकिस्तानचे व्हिडिओ….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे एक्स खाते हॅक झाले.
पाकिस्तान आणि तुर्की येथील व्हिडिओ पोस्ट झाले.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली.
सायबर हल्ल्यामुळे सुरक्षेचे प्रश्न पुन्हा चर्चेत आले.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे एक्स (ट्वीटर) खाते हॅक झाले. त्यांच्या खात्यावर पाकिस्तान अन् तुर्की येथील व्हिडिओ दिसत होते. त्यांचे खाते सध्या रिकव्हर करण्यात आले आहे. पण उपमुख्यमंत्र्यांचे खातेच हॅक झाल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली. राजकीय नेत्यांच्या सायबर हल्ल्यामुळे सुरक्षेचे प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. यावरून राजकीय तर्कवितर्क लावले जात आहेत.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अधिकृत एक्स (Twitter) खाते हॅक झाल्यानंतर एकच खळबळ उडाली. या खात्यावरून पाकिस्तान आणि तुर्की येथील व्हिडिओ पोस्ट झाले आहेत. या घटनेमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आणि सोशल मीडियावर मोठी खळबळ उडाली. थोड्या वेळात एकनाथ शिंदे यांचे एक्स खाते रिकव्हर कऱण्यात आले आहे. पण ही घटना उच्चस्तरीय सायबर हल्ला आणि राजकीय हस्तक्षेप मानली जात आहे. सायबर पोलिसांकडून या घटनेचा तपास कऱण्यात येत आहे. खाते कुणी हॅक केले? याचा शोध घेतला जात आहे. सायबर पोलिसांकडून आयपी अॅड्रेस तपासले जात आहे. हे खाते कुठून हॅक करण्यात आले, त्यामागील हेतू काय होता? याचा शोध घेतला जात आहे.

“जमीनचोर निघाला मुरलीधर”, मित्रपक्षांचा खासदार मोहोळांविरोधात शड्डू? धंगेकरांची सूचक पोस्ट….
निवडणूक आयोगावर राज ठाकरेंचा ‘बोगस’ बॉम्ब..! ‘मतदार यादीत ९६ लाख खोटे मतदार घुसवल्याचा आरोप….
बीडमधील ओबीसी मेळाव्यात छगन भुजबळ अन् धनंजय मुंडेंचं आक्रमक भाषण ; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया….
जीआरचा फुगा फुटतोय, मराठा समाजाचा उद्रेक पुन्हा होतोय..! विखे पाटलांना घेराव….
२४ वर्षांनी बाळा नांदगावकर शिवसेना भवनात, बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणींत अश्रू अनावर, म्हणाले; “लवकरच.”
९ नोव्हेंबरला शिवाजी पार्कवर बंजारा समाजाचा विशाल मोर्चा ; निरंजन नाईक होणार सहभागी….