मुलाला विष पाजून आईची आत्महत्या प्रकरण : मृतक आईवर खुनाचा गुन्हा नोंद
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
स्वप्नील चिकाटे : ९९७०५३५९८८
ढाणकी :
उमरखेड तालुक्यातील निंगणुर ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या आनंतवाडी येथील माहेरी आलेल्या विवाहितेने स्वतःच्या मुलाला विष पाजून स्वतः विष प्राशन केले होती. यामध्ये दोघांचाही मृत्यू झाला होता. ही घटना जुलै महिन्यात घडली होती. याबाबत “मृत्यूचे गूढ कायम”या मथळ्याखाली “पॉलिटिक्स स्पेशल” चे वृत्त प्रकाशित होताच प्रशासन खडबडुन जागे झाले. एक महिन्यानंतर शवविच्छेदनाचा वैद्यकीय अहवाल आल्यानंतर पोलिसांनी मृतक आईवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
सविता विशाल रणमले( वय ३०) असे मृतक विवाहितेचे नाव असून सम्राट विशाल रणमले (वय ४) वर्ष मृतक बालकाचे नाव आहे. सविता हिचा विवाह आठ वर्षापूर्वी कुपटी तालुका माहूर येथील शिक्षक विशाल रणमले सोबत झाला होता .शुक्रवारी सविता आपल्या दोन्ही मुलांना घेऊन माहेरी निघून आनंतवाडी येथे वडीलाकडे माहेरी आली होती. तिचा मोठा मुलगा विराट (वय ७) वर्षे हा आजी सोबत शेतात गेला होता. त्यावेळी घरी असलेल्या सविताने स्वतःच्या लहान मुलगा सम्राटला विषारी औषध पाजून स्वतःही विष प्राशन केले . ही बाब ग्रामस्थांच्या लक्षात येताच दोघांनाही फुलसावंगी प्राथमिक आरोग्य केंद्र उपचाराकरिता नेण्यात आले. उपचारादरम्यान डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केले. त्यांचा मृतदेह महागाव तालुक्यातील सवना ग्रामीण रुग्णालय येथे पाठविण्यात आला. शवविच्छेदना नंतर मृतदेह कुटुंबाच्या ताब्यात देण्यात आला .या घटनेची नोंद महागाव पोलिस स्टेशन येथे घेण्यात आली आहे. आनंतवाडी हे गाव पोलीस स्टेशन बिटरगाव हद्दीत असल्याने पुढील तपासणीसाठी हे प्रकरण बिटरगाव पोलीस स्टेशन कडे पाठवले जाणार असल्याची माहिती मिळाली होती . २२ ऑगस्ट रोजी पोलिसांनी त्या माते विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे व पुढील तपास बिटरगाव पोलीस स्टेशनं चे ठाणेदार विजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रामकिसन जायभाय , गजानन खरात, करत आहेत. .