उपसमितीने मराठा आरक्षणाचा मनोज जरांगेंना पाठवला मसुदा; जीआरमध्ये नेमकं काय असणार?, महत्वाची माहिती समोर….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “मराठा आरक्षणाचा अंतिम मसुदा मराठा आरक्षण उपसमितीने मनोज जरांगे पाटील यांना पाठवण्यात आला आहे.
विजय सूर्यवंशी आणि सचिन गणेश पाटील मनोज जरांगे यांच्याकडे मसुदा घेऊन गेले आहे. मनोज जरांगेंसोबत चर्चा करत या मसुद्याला अंतिम स्वरूप दिला जाणार आहे.
जीआरमध्ये नेमकं काय असणार?
1. कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी गावातील नातेवाईक किंवा कुणबी प्रमाणपत्रधारक यांच्या ॲफिडेव्हिटवर आरक्षण लागू करण्यासंदर्भात विचार आहे.
2. कुणबी नोंदी पडताळणीसाठी तालुका आणि ग्रामपंचायत स्तरावर नवीन स्क्रुटिनी कमिटी स्थापन करून गाव पातळीवर नोंदी शोधण्याचा निर्णय केला जाण्याची तयारी असणार आहे.
3. हैदराबाद गॅजेटियर जसंच्या तसं लागू करता येणार नाही आहे. कारण गॅझेटीयरमध्ये केवळ नंबर्स (लोकसंख्या) आहेत. त्यात स्पष्टता नाही. ते तसंच्या तसं लागू केलं जाऊ शकत नाही अशी सरकारची पातळींवर चर्चा आहे. अशात हे मध्य मार्ग काढत तात्काळ मराठी बांधवांना दिलासा देण्याचा सरकारचा प्रयत्न असेल.
मराठा समाजाच्या उपसमितीत कोण कोण?
१. राधाकृष्ण विखेपाटील, जलसंपदा मंत्री – अध्यक्ष
२. चंद्रकांत पाटील, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री – सदस्य
३. गिरीश महाजन, जलसंपदा मंत्री – सदस्य
४. दादा भुसे, शालेय शिक्षण मंत्री – सदस्य
५. उदय सामंत, उद्योग मंत्री – सदस्य
६. शंभूराज देसाई, पर्यटन मंत्री – सदस्य
७. आशिष शेलार, सांस्कृतिक कार्यमंत्री – सदस्य
८. शिवेंद्रसिंहराजे भोसले, सार्वजनिक बांधकाम मंत्री – सदस्य
९. माणिकराव कोकाटे, क्रीडामंत्री – सदस्य
१०. मकरंद जाधव, मदत व पुनर्वसन मंत्री – सदस्य
११. बाबासाहेब पाटील, सहकार मंत्री – सदस्य
१२. सचिव – सामान्य प्रशासन विभाग – उपसमितीचे सचिव
हैदराबाद गॅझेटियरची प्रत घेऊन भाजपचे माजी नगराध्यक्ष विखे पाटलांच्या भेटीला-
हैदराबाद गॅझेटियरची प्रत घेऊन भाजपचे माजी नगराध्यक्ष सुनिल आर्दड मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकस्थळी दाखल झाले होते. जरांगे पाटील यांनी केलेल्या हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याच्या मागणीला निल आर्दड यांनी समर्थन दर्शवलं. त्यामुळे निल आर्दड हैदराबाद गॅझेटियरची प्रत घेऊन मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष विखे पाटील यांच्या भेटीसाठी दाखल झाले होते.
काय आहे हैदराबाद गॅझेटीयरमध्ये?
1. १९०१ साली झालेल्या मराठवाड्यातील जनगणनेची प्रत १९०९ साली प्रकाशित झाली
2. या प्रती नुसार त्याकाळी मराठवाड्यात ३६ टक्के मराठा कुणबी होते
3. मराठा आणि कुणबी एकच असल्याचा दावा या प्रतीमध्ये उल्लेख आढळतो
4. उत्तराखंड राज्यातील लाल बहादूर शास्त्री प्रशासन अकादमीमध्ये ही प्रत उपलब्ध आहे.
5. या प्रतीमध्ये जिल्हानिहाय कुणबी मराठा लोकसंख्या नमूद केलेली आहे.