‘ज्या फडणवीसने लोकसभेला गेम केला, पोरगं पाडलं हा त्याचंच…’; मनोज जरांगेंनी राज ठाकरेंवर तोफ डागली….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “मुंबईतील आझाद मैदानावर मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा तिसरा दिवस आहे. आज घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी आपण उद्यापासून आपण उपोषण आणखी कडक करणार असल्याचं सांगितलं. यावेळी बोलताना मनोज जरांगे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली.
मनोज जरांगे नेमकं काय म्हणाले? जाणून घ्या.
राज्यातील समाजाचं म्हणणं आहे की दोन्ही भाऊ चांगले आहेत, ठाकरे ब्रँड चालला आहे. विनाकारण मराठ्याच्या प्रश्नाच्या मध्ये पडतो. त्याला आम्ही कधी विचारलं का? ११ ते १३ आमदार निवडून दिले पळून गेले, त्यानंतर आमच्या मराठवाड्यात का आला आम्ही विचारलं का? पुण्यात का आला? नाशिक सासरवाडी आहे, का पन्नासवेळा येता, आम्ही विचारलं का? लोकसभेला गेम केला त्याच फडणवीसने, विधानसभेला त्यानीच तुझ पोरगं पाडलं. तरी तू त्याचे द्रोण वाढतो, राज ठाकरे हे मानाला भुकाल्यालं पोरगं आहे, फडणवीस चहा पिऊन गेले की पक्ष बर्बात झाला तरी त्याला चालतो, आमच्याकडे गावात याला कुचक्या कानाचं बोलतात.
आमची मागणी संविधानाला धरून आहे. मराठा आणिक कुणबी एक आहे, याचा ५८ लाख लोकांचा अहवाल सरकारजवळ आहे. गॅझिटियरमध्ये गावनिहाय आणि तालुकानिहय आणि जिल्हानिहाय नोंदीची आकडेवारी आहे. म्हणजे मराठवाड्यातील मराठा हा कुणबी आहे. असं प्रत्येक गॅझेटियरमध्ये असून सगे सोयऱ्याची अधिसूचना काढली आता अंमलबजावणी करणं बाकीचं आहे. कुणबींची पोटजात उपजात म्हणून घेता येती फक्त त्यांना द्यायचं नाही. मराठे आता घरी झोपायला तयार नाहीत, शनिवार आणि रविवारची वाट न पाहता ते यायला लागलेत. देवेंद्र फडणवीसांचं म्हणणं आहे की आमची मागणी अवैध आहे, आधी १८० जाती घातल्या होत्या मग ३५०-४०० पोटजाती ओबीसी आरक्षणात घातलेल्या अवैध असायला हव्यात. मंडल कमिशनने १४ टक्के आरक्षण दिलं होतं ते आता ३० टक्के झालं. वरचं १६ टक्के अवैध असायला हवे, ५० च्या वरचं ५२ टक्के कसं झालं त्यापण उडवायला हव्या. आमची मागणी कायद्याला सोडून दिसती, बाकीचं अवैध नाही का? असा सवाल करत मनोज जरांगे यांनी आपली भूमिका मांडली.