गावाला जाताना काळाचा घाला, कुलगुरू अन् पत्नीचा जागेवरच मृत्यू, कारचा चक्काचूर….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नागपूर :- “उत्तर प्रदेशातील मऊ जिल्ह्यात भयंकर अपघात
नागपूरमधील कविकुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरु हरेराम त्रिपाठी व पत्नी ठार
इनोव्हा कार ट्रेलरला धडकली; कारचा चुराडा झाला
गावी जाताना घडलेल्या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त
नागपूरमधील कविकुल गुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालय रामटेकचे कुलगुरु हरेराम त्रिपाठी आणि त्यांच्या पत्नी यांच्या इनोव्हा कारचा भयंकर अपघात झाला. बिहारमध्ये आपल्या मूळ गावी जात असताना उत्तर प्रदेशमधील मऊ जिल्ह्यात काळाने घाला घातला. कुटुंबाला भेटण्यासाठी गावी जात असताना आज सकाळी अपघातात निधन झाले. अपघात इतका भयंकर होता की एअरबॅग असतानाही दोघांचा जीव गेला. आज सकाळी साडेसहा वाजता हा अपघात झाला आहे. हरेराम त्रिपाठी हे रामटेकहून त्यांच्या मूळगावी जात होते. त्यावेळी अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला.
उत्तर प्रदेशमधील मऊ जिल्ह्यात हरेराम त्रिपाठी यांच्या इनोव्हा कारचा भयंकर अपघात झाला. सकाळी इनोव्हा कार रस्त्यावर असलेल्या ट्रेलरला जाऊन जोरात धडकली. हा अपघात इतका भयंकर होता की कारचा चुराडा झाला. एअरबॅग असतानाही त्रिपाठी दाम्पत्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर रस्त्यावर एकच गर्दी झाली होती. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली. अपघातग्रस्त वाहन बाजूला केले. अपघातामधील जखमीला उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले. तर त्रिपाठी दाम्पत्याचा मृतदेह पोस्टमार्टमासाठी सरकारी रूग्णालयात पाठवला आहे.
अपघातात जखमी झालेल्या वैभवने पोलिसांना सांगितले की, अपघातात मृत्यू झालेले हरेराम त्रिपाठी हे नागपूरमधील एका विद्यापीठाच्या व्हाइस चान्सलर पदावर होते. हरेराम त्रिपाठी आणि त्यांची पत्नीला घेऊन वैभव नागपूरहून गोपालगंजला परतत होता. सकाळी डोळ्यावर खूप झोप होती, याबाबत हरेराम त्रिपाठींना सांगितले. तेव्हा ते स्वतः गाडी चालवू लागले. बशारथपूरजवळ चाक पंक्चर झाल्याने उभ्या असलेल्या ट्रेलरला इनोव्हा कारची जोरदार धडक झाली. या अपघातात गाडी चालवणाऱ्या हरेराम आणि त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला.