देवेंद्र फडणवीस चांगलं काम करतात…भ्रष्टाचाराचं कोणतं प्रकरण कानावर आलं नाही…अण्णा हजारेंकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक..!

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलं आहे.
देवेंद्र फडणवीस चांगलं काम करत असून त्यांचा साधेपणा मला आवडतो, असं म्हणाले. लेट्सअपला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी यासंदर्भात भाष्य केलं आहे. एकीकडे अण्णा हजारे भाजप सरकारविरोधात बोलत नाही, असा आरोप त्यांच्यावर केल्या जात असतानाच अण्णांनी आता देवेंद्र फडणवीस यांचें कौतुक केल्याने राजकीय प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.
काय म्हणाले अण्णा हजारे?
अण्णा हजारे म्हणाले, ”देवेंद्र फडणवीस यांचा कधी फोन येत नाही. तसा आमचा काही संबंधपण नाही. काही मागणं चांगलं काम करतात. आपण चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट म्हटलं पाहिजे. त्यातला त्यात देवेंद्र फडणवीस चांगलं काम करत आहेत.”
”समाजाच्या भल्यासाठी काम करतात”
यावेळी त्यांना देवेंद्र फडणवीसचं कोणतं काम आवडतं असं विचारलं असता. ”ते आजही एखादा शब्द टाकल्यावर मोडत नाहीत. ते समाजाच्या भल्यासाठी काम करतात. ही गोष्ट मला आवडते. देशाच्या आणि समाजाच्या भल्यासाठी असे कार्यकर्ते तयार झाले पाहिजे. देवेंद्र फडणवीस त्यादृष्टीने मला चांगले वाटतात”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
”भ्रष्टाचार केल्याचं कानावर आला नाही”
पुढे बोलताना ते म्हणाले, ”देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत आजपर्यंत कधीही वाईट गोष्ट कानावर आलेली नाही, त्यांचा कोणता भ्रष्टाचार कानावर आलेला नाही. माणसाने चांगल्या मार्गााने जावं. तसे देवेंद्र फडणवीस चांगल्या मार्गाने जात आहेत. त्यामुळे ते मला आवडतात”, असंही त्यांनी सांगितलं.
पंतप्रधान मोदींच्या कारभारावर बोलताना अण्णा हजारे म्हणाले, मोदी सरकार म्हणजे चलती का नाम गाडी. रूक गये तो खटारा. चांगल्याचा चांगलं म्हणायचं, वाईटाला वाईट म्हटलं पाहिजे. राजकारणात सगळं चांगलं राहत नाही. कुठे न कुठे स्वार्थ असतो, असं देखील त्यांनी सांगितलं. काही लोकांनी माझा राजकीय फायदा करून घेतला, राजकीय स्वार्थासाठी ते टपलेले असतात, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.