संसद भवनाच्या सुरक्षेत मोठी चूक; भिंतीवरून उडी मारत एकाचा थेट संसद भवनात प्रवेश….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- “संसद भवनाच्या सुरक्षेत मोठी चूक झाल्याचे समोर आले असून, एका व्यक्तीने भिंतीवरून उडी मारून संसद भवनाच्या आवारात प्रवेश केल्याने खळबळ उडाली आहे.
ही घटना सकाळी ६:३० वाजता घडली. रेल भवनच्या बाजूने भिंतीवरून उडी मारून एका व्यक्तीने संसद भवनात प्रवेश केला. तो गरुड द्वार येथे पोहोचला, परंतु त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. संसदेच्या सुरक्षेत त्रुटी असल्याचे प्रकरण उघडकीस येण्याची ही पहिलीच वेळ नाही.